कोपरा बु. दि. 15 ऑगस्ट –
ग्रामपंचायत कोपरा बु. अंतर्गत 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद मराठी शाळा आणि जिल्हा परिषद उर्दू शाळा या तिन्ही ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी सरपंच सौ. आम्रपाली गणेश भगत, उपसरपंच मुख्तार शेख, माजी सरपंच शंकर रत्ना राठोड, माजी सरपंच नारायण पवार, माजी सरपंच उत्तम चव्हाण, सदस्य अशरफ खान, ग्रामपंचायत कर्मचारी असीम रब्बानी, संदीप राठोड, नितीन चव्हाण तसेच अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आशा सेविका आणि ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या माध्यमातून स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग, बलिदान आणि देशप्रेमाच्या भावना जपण्याचा संदेश देण्यात आला.
उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना देशाच्या प्रगतीसाठी शिक्षण, शिस्त आणि एकतेचे महत्त्व पटवून सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन खाऊचे वाटप करण्यात आले.
– आसीम रब्बानी, DD NEWS PUSAD




धन्यवाद साहेब