Thursday, February 19, 2026
Google search engine
HomeCrimeकुंभारीत पैनगंगा नदीत आढळला अज्ञात मृतदेह – परिसरात खळबळ, पोलीस तपास सुरु...

कुंभारीत पैनगंगा नदीत आढळला अज्ञात मृतदेह – परिसरात खळबळ, पोलीस तपास सुरु !

कुंभारी  – दिनांक १ सप्टेंबर २०२५
कुंभारी येथे आज संध्याकाळी सुमारे ४ वाजताच्या सुमारास पैनगंगा नदीमध्ये बेवारस मृतदेह आढळून आल्याची घटना घडली. गावात ही बातमी पसरताच एकच धांदल उडाली.

मृत व्यक्तीची ओळख पटत नसल्याने, खंडाळा पोलीस स्टेशनला कळविण्यात आले. माहिती मिळताच एपीआय श्री. विनीत घागे, वरठे साहेब, बीट जमादार चव्हाण, पांडे साहेब, तसेच गावचे पोलीस पाटील मारोतराव मस्के घटनास्थळी दाखल झाले.

गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. त्यानंतर पंचनामा करून एचसी   डॉ. कोल्हे यांनी घटनास्थळीच पोस्टमार्टम केले. सध्या पावसामुळे नदीला मोठा पूर आलेला असल्याने मृतदेह रस्त्याच्या कडेला आणून JCB च्या सहाय्याने खड्डा खोदून अंत्यविधी करण्यात आला. अंत्यविधी कुंभारी येथेच पार पडला.

मृतदेह हा अंदाजे ५० वर्षीय पुरुषाचा असल्याचे समजते. या सर्व घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून पोलीस तपास सुरु आहे.

या संपूर्ण प्रक्रियेत ग्रामपंचायत सदस्य ईश्वर जाधव, शुभम पवार (होमगार्ड) यांनी पोलिसांना रात्री उशिरापर्यंत म्हणजेच सुमारे १० वाजेपर्यंत सहकार्य केले.

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments