Thursday, February 19, 2026
Google search engine
HomeJobनवा जोश ..नवा संघर्ष ग्रामपंचायत संगणक परिचालकांचा एल्गार ! पुसद पंचायत...

नवा जोश ..नवा संघर्ष ग्रामपंचायत संगणक परिचालकांचा एल्गार ! पुसद पंचायत समितीत सभा संपन्न

पुसद | 15 जुलै 2025
“हक्क नाकारणाऱ्या सरकारला आता शांत बसू देणार नाही!” – या संतप्त घोषणांनी आज पुसद पंचायत समिती दणाणून गेली..
ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेची भव्य सभा आज अध्यक्ष अरुण भिमराव बरडे यांच्या नेतृत्वात पार पडली. उपाध्यक्ष सचिन ठाकरे, ईश्वर जाधव सह तालुक्यातील शेकडो परिचालक कार्यकर्ते या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे हि वाचा -ग्रामपंचायती झाल्या  ऑफलाईन  

१४ वर्ष सेवा… तरीही शासनाचे दुर्लक्ष ! 

     ग्रामपंचायत स्तरावर दिवसरात्र शासनाच्या योजना राबवणारे संगणक परिचालक, आजही रोजगार हमीच्या मजुरांपेक्षाही कमी मजुरीवर काम करत आहेत.
शासनाच्या ई-गव्हर्नन्स यंत्रणेचा कणा असलेले हे कर्मचारी कधी मानधनासाठी महिनोंमहिने वाट पाहतात, कधी फुकट शासकीय कामे करतात – आणि तरीही त्यांच्याकडे शासनाचे दुर्लक्ष सुरूच!

     संगणक परिचालक हा जन्म दाखले, मृत्यू दाखले, घरकुलाचे अर्ज, शौचालय योजना, नळजोडणी, मजुरांच्या हजेरी, ग्रामसभेचे अहवाल, आणि शासनाच्या कितीतरी योजनांची कामं  पार पडत असतो. . तो  फक्त टायपिंग करणारा नाही, तर  गावाचं डिजिटलीकरण करणारा  डिजिटल पुरुष  आहे. – सचिन ठाकरे

आम्हाला भीक नको, आम्हाला आमचा हक्क हवा!”
– सभा दरम्यान उपस्थित परिचालकांची गगनभेदी गर्जना

अन्यायाला चपराक देणारी सभा !

या बैठकीत संघटनेने आक्रमक भूमिका घेत पुढील निर्णय जाहीर केले :

  • तालुका, जिल्हा व राज्यस्तरीय आंदोलनात घेणार सक्रीय सहभाग
  • बाहेरील प्रोजेक्ट/फुकटची कामे न करण्याचा ठाम निर्णय
  • डिजिटल ग्रुप तयार करून लढ्याला नवी धार देणार
  • सक्रीय सभासदांना पुढील संघटनात्मक जबाबदाऱ्या देणार
  • दोन वेळा गैरहजर राहणाऱ्यांचे सभासदत्व रद्द करणार
  • प्रत्येक सभेला हजेरी सक्तीची अनुपस्थिती म्हणजे संघटनेशी गद्दारी !

संघटनेचा एल्गार – “मानधन मिळेपर्यंत थांबायचं नाही!

ईश्वर जाधव यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की ,

आम्ही आंदोलने केली, उपोषण केले, निवेदनं दिली… आता आतजाऊनच बोलणार !”
सरकार  आमचं ऐकत नसेल, तर आम्ही आता सरकारला त्याची जागा दाखवणार !

हि फक्त सभा नव्हती, तर एका लढ्याची नांदी होती !

ही सभा म्हणजे केवळ एक गाठभेट नव्हती – तर ही होती वंचित संगणक परिचालकांच्या स्वाभिमानाची मशाल !
आजपासून पुसद तालुक्यातून नवचेतनेचा उठाव सुरू झाला आहे – जो थांबणार नाही, झुकणार सुद्धा नाही !

RELATED ARTICLES

8 COMMENTS

  1. Very good sir असच केंद्र चालक यांचा प्रतिसाद असला तर संघटना मजबूत होत राहते पण काही केंद्र चालक आहेत संघटना फोडणारे तरी काही हरकत नाही आपण एक अहो एक राहु आणि संघटना चालवू दर महिन्याला संघटनेची मीटिंग ठेवत जाऊ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments