Thursday, February 19, 2026
Google search engine
HomenewsFestival of Bulls | लाखी गावात एकोप्याने पोळा साजरा

Festival of Bulls | लाखी गावात एकोप्याने पोळा साजरा

लाखी (प्रतिनिधी) – पारंपारिक पद्धतीने आणि उत्साहाच्या वातावरणात लाखी गावात बैल पोळा साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांच्या जीवनात अविभाज्य ठरलेला बैल हा केवळ शेतीकामाचा साथीदार नसून घरचा सदस्य मानला जातो. त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दरवर्षी पोळा सण साजरा केला जातो.

सणाच्या निमित्ताने गावातील प्रत्येक शेतकरी आपल्या “सरजा राजाला” चार ते पाच दिवस अगोदरच आंघोळ घालून सजवू लागतो. रंगरंगोटी, साजशृंगार करून आपली बैलजोडी इतरांपेक्षा सुंदर दिसावी, यासाठी प्रत्येकाच्या मनात आनंदाची आणि स्पर्धेची भावना असते.

या दिवशी बैलांना पुरण-पोळीचा नैवेद्य अर्पण करून देवासमान पूजा केली जाते. परंपरेप्रमाणे कष्टाचा दिवस म्हणून आणि बैलांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा सण मोठ्या भक्तिभावाने पार पडतो.

यंदाही लाखी गावात तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. गावातील मान्यवर नागरिक, पोलिस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह लाखी पोलीस स्टेशनचे बीट जमादार व सहकारी कर्मचारी, तसेच “लाखी युवा मित्र मंडळ” यांनीही उपस्थित राहून एकोप्याने सण साजरा केला. बैलपोळा सणाच्या निमित्ताने गावात सामाजिक ऐक्याचे, बंधुभावाचे आणि परंपरेचे दर्शन घडले.

रवि राठोड, DD NEWS PUSAD

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. एकत्र साजरा झाला हा पोळा हाच सर्वात मोठा सन रवी भाऊ आनंदाची बाब आहे 👍

  2. थाटामाठात,आनदात व गुण्यागोविंदाने पोळा पार पडला म्हणजेच सामाजिक ऐक्याचे खरोखरच दर्शन घडतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments