Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsपत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते राजेश ढोले यांना ‘धम्मभूषण’ पुरस्कार जाहीर

पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते राजेश ढोले यांना ‘धम्मभूषण’ पुरस्कार जाहीर

पुसद तालुका प्रतिनिधी : पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीचे विदर्भ उपसंपादक तसेच दैनिक सुवर्ण महाराष्ट्रचे पुसद तालुका प्रतिनिधी असलेले राजेश ढोले यांना ‘धम्मभूषण’ पुरस्कार जाहीर झाला आहे. महाबोधी बहुउद्देशीय संस्था, अमरावती शाखा – वटफळी (ता. नेर, जि. यवतमाळ) यांच्या वतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

वटफळी (ता. नेर) येथे ३ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ३४ व्या धम्म परिषदेत राजेश ढोले यांना सन्मानित करण्यात येणार आहे. लक्ष्मीनगर, बोरगडी (ता. पुसद) येथील रहिवासी असलेले उपासक राजेश ढोले हे सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहेत.

भगवान गौतम बुद्धांच्या विश्वकल्याणकारी धम्ममार्गावर चालत, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतामूलक भारताच्या संकल्पनेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याच्या त्यांच्या कार्यामुळे पुढील पिढीला योग्य दिशा मिळत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

या धम्म परिषदेला भदंत धम्मसेवकजी महाथेंरो (मुळावा) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्री मा. संजय शिरसाट, तसेच देश-विदेशातील भिक्खू व भिक्खुणी संघ उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

धम्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पुसद तालुक्यातील धम्मबांधव, मित्रपरिवार तसेच सामाजिक क्षेत्रातील विविध स्तरांतून राजेश ढोले यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत असून, सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments