Thursday, February 19, 2026
Google search engine
HomeSport"लाखीचा कबड्डी शिलेदार अजय राठोडची इराणपर्यंत भरारी !" | Lakhi to Iran

“लाखीचा कबड्डी शिलेदार अजय राठोडची इराणपर्यंत भरारी !” | Lakhi to Iran

लाखी प्रतिनिधी –  लाखी गावचा लाल आणि गरीब कुटुंबातील सुपुत्र अजय मनोहर राठोड याने आपल्या जिद्दी, चिकाटी व अथक मेहनतीच्या जोरावर  कबड्डीच्या मैदानात आज एक नवा इतिहास रचला आहे.

शेतमजुरी व ऊसतोडणी करणाऱ्या आई–वडिलांचा मुलगा अजय, लहानपणापासूनच कबड्डी खेळात रमला होता. घरची परिस्थिती बिकट असताना सुद्धा अजयने हार मानली नाही. आई–वडील घरी नसताना गावात लोकांची मोलमजुरी करून घरखर्च व शाळेचा खर्च भागवणारा हा मुलगा, मैदानावर मात्र संघाला विजय मिळवून देणारा खरा ‘शिलेदार’ ठरला.

गावोगाव, शाळेशाळेत खेळल्या जाणाऱ्या कबड्डी सामन्यांत अजयने सातत्याने चमक दाखवत संघाला विजयी केले. विदर्भ संघातही काही दिवस अजयने स्वतःच्या जोरावर विजय मिळवून नाव लौकिक केले.

आता या मेहनतीचे खरे फलित मिळाले असून, अजय राठोड याची इराण (बहीरण) येथे होणाऱ्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय युथ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी “अंडर 18 एशियन युथ कॅम्पस कबड्डी इंडिया टीम” मध्ये निवड झाली आहे!

लाखी गावापासून थेट इराणपर्यंतचा प्रवास हा केवळ अजयचा नाही, तर संपूर्ण गावाचा अभिमान आहे. लाखी गाव पूर्वीपासूनच कबड्डीसाठी प्रसिद्ध असून आजही लहानांपासून मोठ्यांपर्यंत या खेळाची आवड आहे. या गावातील माजी खेळाडू आणि सध्याचे तरुण खेळाडू यांनीही अजयचे जोरदार अभिनंदन केले.

अजय म्हणतो“आई–वडिलांचा त्याग, गुरुजनांचे मार्गदर्शन, स्वतःची मेहनत आणि गावाचा आशीर्वाद यामुळेच हे यश शक्य झाले. माझ्या खेळातून मी आई–वडिलांचे नव्हे तर संपूर्ण लाखी गावाचे नाव देश-विदेशात पोचवणार आहे.”

अजयच्या या यशामुळे लाखी गावात जल्लोषाचे वातावरण असून गावकऱ्यांसाठी ही केवळ आनंदाची नाही तर अभिमानाची बाब ठरली आहे.

– रवि राठोड, DD NEWS PUSAD 

RELATED ARTICLES

4 COMMENTS

  1. गरीब कुटुंबातील एक मुलगा स्वतःच्या मेहनतीवर गावापासून तर देश विदेशा पर्यंत कबड्डी स्पर्धेत नाव केल्याबद्दल खुप अभिनंदन ही बातमी ddnews नि जनते पर्यंत पोहोचविल्या बद्दल खुप खुप धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments