पुसद – तालुक्यातील मांडवा येथे लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात पुस्तकांची उल्लेखनीय भर पडत असून, ज्ञानवृद्धीचा हा उपक्रम गावासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
दि. २६ जानेवारी रोजी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या सहकार्याने या वाचनालयाची निर्मिती करण्यात आली. सुरुवातीपासूनच गावातील दानशूर व्यक्ती व शिक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या उत्साहाने योगदान दिले आहे.
वाचनालयासाठी अनुकूल चव्हाण यांनी ₹७०१० रुपयांची आर्थिक मदत दिली, तर ॲड. आप्पाराव मैंद यांनी २५ पुस्तके भेट दिली. ग्रामपंचायत अधिकारी एस. टी. तडसे यांनी १२ पुस्तके तर आर्मी पंजाब राठोड यांनी २ स्पर्धा परीक्षेची पुस्तके प्रदान केली.
नुकतीच या उपक्रमात आणखी भर पडली असून, नारायणराव काळे स्मृती मॉडेल कॉलेज, कारंजा (घा.), जि. वर्धा येथील प्रा. डॉ. उल्हास राठोड यांनी ३३ पुस्तके भेट दिली. प्रा. डॉ. वंदना तागडे यांनी ४ पुस्तके, प्रा. डॉ. महेंद्र गावंडे यांनी ७ पुस्तके, तर प्रा. डॉ. अमित याऊल यांनी २६ पुस्तके वाचनालयास दिली. विशेष म्हणजे स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अशी ७० पुस्तके प्रा. डॉ. उल्हास राठोड यांनी स्वतः भेट देऊन वाचनालयाच्या सुव्यवस्थेचे कौतुक केले तसेच भविष्यात आणखी पुस्तके देण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी प्रा. डॉ. उल्हास राठोड, मुख्याध्यापक कैलास भरगाडे, शिक्षक नरेश नालमवार, गजेंद्र थोरात, राखी जयस्वाल, भारती शेळके तसेच ग्रामस्थ भिमराव ढोले, रमेश ढोले, दयाशील ढोले, डी. के., विक्रम राठोड, राजू ढोले, अजय ढोले, वैभव ढोले, निलेश ढोले, संदेश ढोले आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी उपस्थित होते.
लोकसहभागातून उभारलेले हे वाचनालय गावातील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचे केंद्र ठरत असून, शिक्षणवृद्धीच्या दृष्टीने मांडवा गावाने उचललेले हे पाऊल निश्चितच स्तुत्य आहे.
संपादक – अरुण बरडे,
DD NEWS PUSAD



