कराड, दि. २० ऑगस्ट – करिअरमध्ये लवकर यश मिळविण्याच्या हव्यासापोटी अनेक तरुण-तरुणी चमकदार संधींच्या मागे धावत आहेत. मात्र, याच संधीचा गैरफायदा घेणाऱ्या प्रवृत्तीमुळे गंभीर गुन्हेगारी प्रकार वाढीस लागले आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यात आयटी कंपनीत काम करणाऱ्या 28 वर्षीय अभिनेत्री तरुणीला गाण्यांच्या अल्बममध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून कराड येथे नेऊन बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी कराड येथील विशाल दीपक याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदननगर पोलिसांनी दाखल केलेला हा गुन्हा ‘झिरो एफआयआर’च्या माध्यमातून कराड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
पीडित तरुणी मूळची परराज्यातील असून सध्या पुण्यात कार्यरत आहे. अभिनयाची आवड असल्याने तिने ‘ओम तेजा प्रॉडक्शन’ नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन केला होता. या ग्रुपवर विशालने शॉर्ट फिल्मसाठी मुलगी हवी असल्याचे पोस्ट टाकले. त्यानंतर त्याने तरुणीशी संपर्क साधून “अल्बम साँगसाठी शूटिंग आहे” असे सांगत तिला कराड येथे बोलावले.
त्यानुसार, तरुणी जून महिन्यात कराडला गेली. विशालने बसस्थानकावरून तिला थेट स्वतःच्या घरी नेले. दोन दिवस सलग विविध घाटांवर अल्बमचे शूटिंग झाले. मात्र तिसऱ्या दिवशी विशालने तिला एका रिकाम्या फ्लॅटवर नेऊन बलात्कार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
घटनेनंतर विशालने तिला पुण्यात पाठवले. तरीदेखील तो फोनवर सतत संपर्क साधत राहिला. इतकेच नव्हे, तर “लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू या” असा आग्रहही त्याने धरला. तरुणीने नकार दिल्यावर त्याने तिचा पाठलाग सुरू केला. हा प्रकार ७ जून २०२५ ते १७ ऑगस्ट २०२५ दरम्यान पुणे व कराड येथे घडल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणामुळे पुन्हा एकदा समाजात चर्चा रंगली आहे. दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ होत असून “चूक कोणाची?” हा प्रश्न सर्वत्र उपस्थित होत आहे. तरुण पिढीची विचारशैली बदलत चालली असून, जलद यशाच्या हव्यासापायी ते सहज फसले जात आहेत, अशी टीकाही होत आहे.




हे अशा हरामखोर लोका वर कडक कारवाई करावी
हव्यासापोटी लोकं कोणत्याही थराला जात आहे. मुलींची अब्रू धोक्यात आहे, यावर कडक कार्यवाही करायला हवं
दुदैव आहे