Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsखंडाळ्यात तरुणांचा ऐतिहासिक निर्धार – ‘ग्रामसेवा संघ’ची स्थापना | Be Alert|DDNEWSPUSAD

खंडाळ्यात तरुणांचा ऐतिहासिक निर्धार – ‘ग्रामसेवा संघ’ची स्थापना | Be Alert|DDNEWSPUSAD

खंडाळा | दि. ७ सप्टेंबर – गावाच्या सर्वांगीण विकासासाठी खंडाळा गावातील तरुणाई आता सज्ज झाली आहे. सावित्रीबाई फुले अभ्यासिका येथे आयोजित सभेत गावातील २५ ते ३० तरुण एकत्र आले आणि गावाचा विकास आमच्या हातात” या निर्धाराने एकात्मिक ग्रामसेवा संघ’ या संघटनेची स्थापना करण्यात आली.

सभेत ठरविण्यात आले की, ग्रामपंचायतीकडून जी कामे होत नाहीत किंवा अपूर्ण राहतात, ती कामे गावातील तरुण श्रमदानातून पूर्ण करतील. तसेच गावात असलेल्या शासकीय कार्यालये व सेवांच्या कामावर लक्ष ठेवून, जनतेच्या अडचणी सोडविण्याचे काम ही संघटना करणार आहे. त्यामुळे गावाच्या प्रगतीला नवे पंख फुटणार आहेत.

संघटनेची रचना गुप्त मतदानाद्वारे पार पडली. यात अध्यक्षपदी कृष्णा पृथ्वीराज गायकवाड, उपाध्यक्षपदी सिद्धार्थ लिंबाजी इंगोले, सचिवपदी सचिन विलास गायकवाड तर सल्लागारपदी पवन आनंदराव गादेकर यांची निवड झाली. निवड झाल्यानंतर संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण पसरले.

या संघटनेत सामील झालेल्या तरुणांनी ग्रामपंचायतीतील कारभार समजून घेण्याची शपथ घेतली. “आम्ही शिकू, जाणून घेऊ आणि गावाचा प्रत्येक प्रश्न सोडवून दाखवू,” असे स्पष्टपणे सांगितले.

यापुढे पशुवैद्यकीय दवाखाना, शाळा, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, लाईनमन, आरोग्य सेवक, आशा वर्कर आणि अंगणवाडी यांच्या कामकाजावर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे. ते आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत आहेत का, त्यांना काही अडचणी आहेत का, याचा शोध घेऊन त्या समस्या सोडविण्यासाठी संघ प्रयत्नशील राहील.

या उपक्रमाबाबत गावकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. खंडाळा गावाच्या विकासासाठी आता एक नवे पर्व सुरू झाले आहे. तरुणाईने एकत्र येऊन घेतलेली ही शपथ गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाची ठरेल,” अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली.

RELATED ARTICLES

6 COMMENTS

  1. खूप छान उपक्रम.. सर्व गावातील युवकांनी असा निर्णय घेऊन गावाचा विकास घडवून आणला पाहिजे.

  2. चांगली संकल्पना आहे. तरुण मंडळाचे अभिनंदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments