Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsहृदय विकार निदानासाठी पार्डी येथे विशेष आरोग्य शिबिर

हृदय विकार निदानासाठी पार्डी येथे विशेष आरोग्य शिबिर

पार्डी (ता. पुसद) | – दिनांक ३० जुलै २०२५ रोजी प्रा. आरोग्य केंद्र जांबबाजार अंतर्गत उपकेंद्र पार्डी येथे “NCD (Non-Communicable Diseases) प्रोग्राम” अंतर्गत ECG तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर मा. वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक पोले सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. वाढत्या हृदयविकारांच्या पार्श्वभूमीवर व विशेषतः बीपी व मधुमेह (शुगर) रुग्णांमध्ये निर्माण होणाऱ्या गुंतागुंतीसाठी लवकर निदान होणे अत्यंत गरजेचे झाले आहे. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून ECG तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात ३० वर्षांवरील अनेक स्त्री-पुरुषांची ECG तपासणी करण्यात आली. यासोबतच बीपी आणि शुगरचीही तपासणी करण्यात आली. सध्या ग्रामीण भागातही हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे, मानसिक ताणतणावामुळे आणि व्यायामाच्या अभावामुळे अगदी तरुण व मध्यमवयीन व्यक्तींनाही हृदयाशी संबंधित आजारांचा सामना करावा लागत आहे. विशेषतः ज्या नागरिकांना बीपी व शुगर सारखे आजार आहेत, त्यांच्यासाठी हृदयविकाराचा धोका अधिक असतो. म्हणूनच ECG ही तपासणी लवकर निदानासाठी अत्यंत प्रभावी ठरते.

शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांना NCD प्रोग्रामविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. डॉ. देविता पवार (समुदाय आरोग्य अधिकारी) व आरोग्य सेविका एस. पी. क्षिरसागर यांनी आरोग्य शिक्षणाद्वारे उपस्थितांना या आजारांपासून बचावाचे उपाय, आहारातील बदल, नियमित तपासणीचे महत्त्व, औषधांचे वेळेवर सेवन आणि तणावमुक्त जीवनशैली याबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीत आरोग्य सहाय्यक ए. एफ. जाधव, आरोग्य सेवक ए. डी. हातमोडे, , NCD स्टाफ नर्स निकिता देवानंद कांबळे तसेच पार्डी येथील सर्व आशा कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत घेतली. त्यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अत्यंत शिस्तबद्ध व प्रभावी पद्धतीने पार पडला.

या आरोग्य तपासणी उपक्रमाला ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ECG तपासणीसाठी आलेल्या अनेक ज्येष्ठ व मध्यमवयीन नागरिकांनी आपल्या मनोगतातून समाधान व्यक्त केले. “अशा तपासण्या वेळोवेळी गावात व्हाव्यात, म्हणजे वेळेआधीच काही आजार लक्षात येतील,” अशी प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नागरिकाने दिली.

या उपक्रमाच्या माध्यमातून “रोग होण्यापूर्वीच त्याचे निदान” हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होऊन, त्यांचा जीवनमान उंचावण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

  • अरुण बरडे, DD NEWS PUSAD
RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments