Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsआई–वडिलांच्या स्मरणार्थ शांतीधामास साउंड सिस्टीम भेट

आई–वडिलांच्या स्मरणार्थ शांतीधामास साउंड सिस्टीम भेट

पुसद (प्रतिनिधी):
पुसद तालुक्यातील मांडवा येथील ग्राम परिवर्तन समितीच्या वतीने सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य सातत्याने राबविले जात असून या उपक्रमांना लोकसहभागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

दि. ७ मार्च २०२० पासून ग्राम परिवर्तन समितीने संत–महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीनिमित्त वृक्षारोपण, वाढदिवसानिमित्त शांतीधामास उपयुक्त साहित्य भेट देणे, वृक्ष भेट देऊन वाढदिवस साजरा करणे तसेच आई–वडिलांच्या स्मरणार्थ शांतीधामास आवश्यक साहित्य प्रदान करणे असे विविध उपक्रम राबविले आहेत.

शांतीधामासाठी आवश्यक असलेल्या साउंड सिस्टीमची गरज लक्षात घेऊन मांडवा येथील राजेश मंदाडे (रा. मांडवा, ह. मु. देशमुखनगर, पुसद) यांनी आपल्या वडील स्व. लक्ष्मण मंदाडे व आई स्व. राहीबाई मंदाडे यांच्या पवित्र स्मरणार्थ शांतीधामास भोंगा, अ‍ॅम्प्लिफायर, माईक तसेच साहित्य ठेवण्यासाठी पेटी अशी साउंड सिस्टीम भेट देऊन ही गरज पूर्ण केली.

या प्रसंगी उपसरपंच विजय राठोड, ग्रामपंचायत अधिकारी एस. टी. तडसे, रमेश ढोले, कैलास राठोड, ग्रामपंचायत कर्मचारी प्रद्युम्न आबाळे तसेच ग्राम परिवर्तन समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात येणाऱ्या अशा उपक्रमांमुळे ग्राम परिवर्तन समितीचे कार्य प्रेरणादायी ठरत असून समाजात सकारात्मक संदेश जात आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

संपादक – अरुण बरडे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments