Thursday, February 19, 2026
Google search engine
HomeAgricultureग्रामपंचायत पार्डी येथे कृषी दिन व स्व. वसंतराव नाईक जयंती साजरी |...

ग्रामपंचायत पार्डी येथे कृषी दिन व स्व. वसंतराव नाईक जयंती साजरी | DD NEWS PUSAD | Pardi | Krushi Deen | Vasantrao Naik

ग्रामपंचायत पार्डी येथे कृषी दिन व स्व. वसंतराव नाईक जयंती साजरी | DD NEWS PUSAD | Pardi | Krushi Deen | Vasantrao Naik

Pardi-Vasantrao-Naik-Jayanti-2025
Pardi-Vasantrao-Naik-Jayanti-2025

पुसद –

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतरावजी नाईक यांची १०९ वी जयंती आज साजरी करण्यात आली. सर्वप्रथम स्व. वसंतराव नाईक यांच्या मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. व सर्वाना तीर्थप्रसाद वाटप करण्यात आला.

आजचा हा दिवस संपूर्ण देशात कृषीदिन म्हणून साजरा केला जातो. स्व. वसंतराव फुलसिंग नाईक हे प्रख्यात कृषीतज्ञ, प्रगतशील शेतकरी व राजनितीज्ञ होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी सर्वाधिक काळ विराजमान होते. नाईक यांचा जन्म पुसद जवळील गहुली या छोट्याशा खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात १ जुलै १९१३ रोजी झाला. वसंतराव नाईक हरितक्रांती , पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक मानले जातात.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पार्डीच्या सरपंच उषाताई विठ्ठलराव जाधव ह्या होत्या. तर कार्यक्रमाला ग्रामपंचायत रामदास केवटे, समाधान केवटे, ज्ञानेश्वर राठोड, नंदू कांबळे, अरुण बरडे, समाधान शिनगारे, ओंकार पवार, रामचंद्र राठोड, देविदास झरकर सह गावातील नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

34 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments