Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsश्री मनोहरराव नाईक माध्यमिक विद्यालय, पार्डी येथे भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा...

श्री मनोहरराव नाईक माध्यमिक विद्यालय, पार्डी येथे भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा स्पर्धा संपन्न

पुसद दि. 13 –
मनोहरराव नाईक माध्यमिक विद्यालय, पार्डी येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जनजाती गौरव पंधरवाडा” या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.

या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याची ओळख व्हावी, त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी घटना समजाव्यात, हा या उपक्रमाचा उद्देश होता.

भगवान बिरसा मुंडा हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील आदिवासी समाजातील एक महानायक होते. त्यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झाला. त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध “उलगुलान” म्हणजेच बंड पुकारून आदिवासी समाजात एकतेचा आणि स्वाभिमानाचा संदेश दिला. अल्पायुष्यातच त्यांनी अन्याय, शोषण आणि गुलामीविरुद्ध लोकांमध्ये जाज्वल्य क्रांती चेतवली. त्यांच्या कार्यामुळे त्यांना धरती आबा” म्हणून सन्मानाने ओळखले जाते.

स्पर्धेच्या सुरुवातीला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बिरसा मुंडा यांच्या जीवनाविषयी सविस्तर माहिती दिली व त्यावर आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात आली.
स्पर्धेत प्रथम क्रमांक – पलक केवटे (इ. ७ वी), द्वितीय क्रमांक – सम्राट बेहडे (इ. ७ वी)तृतीय क्रमांक – शिल्पा पवार (इ. ८ वी) यांनी उत्कृष्ट कामगिरी करत  पटकावले.

या उपक्रमाचे नियोजन श्री. आढाव सर, श्री. मंगेश तिडके सर, श्री. चव्हाण सर व श्री. रशीद सर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम मनोहरराव नाईक माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. सोनोने सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जनजाती महानायकांविषयी आदरभाव व प्रेरणा निर्माण झाली असून, मनोहरराव नाईक शाळेने समाजप्रबोधनाचा आदर्श निर्माण केला आहे.

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. अप्रतिम अतिशय स्तुत्य उपक्रम आपण घेतला सर्व प्राध्यापक व संबंधित शिक्षकांचे विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा…. 👍🙏🙏🙏🌹🌹🌹

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments