Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsआश्रम शाळा फुलवाडीच्या कुस्तीपटूंची विभागस्तरीय निवड |

आश्रम शाळा फुलवाडीच्या कुस्तीपटूंची विभागस्तरीय निवड |

फुलवाडी (ता. पुसद), दि. २५ ऑगस्ट – ज्ञानोपासक शिक्षण प्रसारक मंडळ, फुलवाडी द्वारा संचालित स्व. आप्पासाहेब अत्रे विजाभज आश्रम शाळा फुलवाडी, ता. पुसद, जि. यवतमाळ येथील नऊ कुस्तीपटू विभागस्तरासाठी निवडले गेले आहेत. हे विद्यार्थ्यांचे क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय यश म्हणता येईल.

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, यवतमाळ, आणि पुसद तालुका शारीरिक शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी सोमवार फुलसिंग नाईक महाविद्यालय, पुसद येथे जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

यामध्ये दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आश्रम शाळा फुलवाडीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. शाळेतील विद्यार्थी कुस्तीपटूंच्या शालेय यशाची परंपरा कायम राहिली आहे. स्पर्धेत विविध वजनी गटांमध्ये ग्रीको रोमन व फ्री स्टाईल कुस्ती करण्यात आली.

17 वर्षाखालील गटात ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत राज इंदल चव्हाण (80 किलो), युवराज उल्हास जाधव (55 किलो), क्रिश जैस्वाल (48 किलो), नैतिक संतोष पवार (45 किलो) आणि रोहिणी प्रेम राठोड (45 किलो) यांनी विजयी ठरले. तर 14 वर्षाखालील फ्री स्टाईल स्पर्धेत रोहन दिलीप चव्हाण (62 किलो), ऋतुजा रवींद्र राठोड (42 किलो), अदिती संतोष चव्हाण (30 किलो) आणि रिया अविनाश चव्हाण (62 किलो) यांनी उत्कृष्ट कामगिरी करत स्पर्धेत विजय मिळवला.

सर्व विजयी कुस्तीपटूंचे अभिनंदन शाळेचे मुख्याध्यापक कलिंदर सर, संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दीपक चव्हाण, सचिव राजेंद्र चव्हाण, तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी यांनी केले. या सर्व कुस्तीपटूंना क्रीडा शिक्षक ईशान चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.

स्पर्धेत विद्यार्थ्यांचे उत्कृष्ट प्रर्दशन आणि परिश्रम लक्षात घेता, आश्रम शाळा फुलवाडीच्या कुस्तीपटूंचा गौरव योग्य ठरतो. शाळेच्या व्यवस्थापनाने या यशाची नोंद घेत, विद्यार्थ्यांच्या क्रीडा विकासासाठी अधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

यापुढे देखील आश्रम शाळा फुलवाडीच्या विद्यार्थ्यांकडून क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. यामुळे शाळेच्या प्रतिष्ठेवर भर पडेल आणि तरुणांना क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल.

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments