Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsजि.प. वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा पार्डी येथे माजी विद्यार्थी संघाची स्थापना

जि.प. वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा पार्डी येथे माजी विद्यार्थी संघाची स्थापना

पुसद प्रतिनिधी :
आज दिनांक ०८ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा, पार्डी येथे उत्साहपूर्ण वातावरणात माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. या प्रसंगी असंख्य माजी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या जुन्या शाळेच्या आठवणींना उजाळा दिला.

या नव्याने स्थापन झालेल्या संघाचे अध्यक्ष म्हणून श्री. सुभाष बळीराम केवटे, उपाध्यक्ष म्हणून श्री. संदीप माधव कानडे, सचिव म्हणून श्री. संतोष पदमवार, तर कोषाध्यक्ष म्हणून श्री. नितीन सतीश कांबळे यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून संदीप हरिभाऊ कानडे, नरेंद्र प्रभू ढोले, सुजित देविदास टेमकर, लहू मारोती देवकते, बबन साधू पाईकराव, पांडुरंग किसन गोरे आणि अरुण भिमराव बरडे यांची निवड झाली.

त्याचबरोबर सल्लागार सदस्य म्हणून संघपाल आडोळे, सेवानिवृत्त कर्मचारी प्रतिनिधी म्हणून विजय लक्ष्मण शिनगारे, पालक प्रतिनिधी म्हणून नागोराव बापूराव चिरमाडे, तसेच नवयुवक प्रतिनिधी म्हणून रितेश झरकर यांची निवड करण्यात आली.

या माजी विद्यार्थी संघाच्या माध्यमातून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले. शाळेतील सुविधांचा विकास, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत, तसेच शैक्षणिक गुणवत्तेचा स्तर उंचावण्यासाठी नियोजन करण्याचा संकल्प उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी केला.

निवडीनंतर नव्या संघाने शाळेच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. शाळेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक व आर्थिक मदत पुरविणे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणे, वृक्षारोपण व स्वच्छता उपक्रम राबविणे, तसेच डिजिटल शिक्षणास चालना देणे अशा उपक्रमांची अंमलबजावणी करण्याचा संकल्प उपस्थितांनी केला.

शाळेच्या मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणात माजी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना सांगितले की, “माजी विद्यार्थी ही शाळेची खरी ओळख असते. त्यांचे यश हे शाळेचे यश असते.” कार्यक्रमादरम्यान अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शाळेच्या जुन्या आठवणींनी सगळे क्षणभर भावूक झाले.

या कार्यक्रमास शाळेचे सर्व शिक्षकवर्ग, विद्यार्थी, तसेच गावातील पालक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडले.

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments