पुसद – भोजला-जांबबाजार रोडवर आज दुपारी ४ वाजता एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून जुन्या कापसाच्या जिनिंगसमोर असलेल्या नाल्यात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडालीआहे. काही क्षणांतच घटनेची वार्ता पसरली आणि मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी जमली.
प्राथमिक माहितीनुसार मृत महिला ही जांबबाजार येथील रहिवासी असून तिचे वय अंदाजे ४५ वर्षे होते. तिचा पती तीन-चार वर्षांपूर्वी मरण पावला होता. दोन लहान मुले असून, कुटुंबाचा भार तीच सांभाळत होती. विशेष म्हणजे, ही महिला १५ ऑगस्टपासूनच बेपत्ता होती, अशी माहितीही स्थानिकांनी दिली.
महिलेचा मृतदेह नाल्यात कसा आला, हा प्रश्न उपस्थित होत आहे. काहींच्या मते हा घात असू शकतो, तर काहींच्या मते हा दुर्दैवी अपघात असावा. मात्र, घटनेमुळे परिसरात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून पंचनामा सुरू केला आहे. मृतदेहाला उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे. तपासानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल.
दरम्यान, अचानक बेपत्ता झाल्यानंतर महिलेचा मृतदेह अशा अवस्थेत सापडल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे व शंकेचे वातावरण निर्माण झाले आहे. हा खून आहे की अपघात ? या प्रश्नाचे उत्तर आता पोलिस तपासानंतरच मिळणार आहे.
– संविधान धूळधुळे/सचिन ठाकरे, DD NEWS PUSAD




घात की अपघात
पोलिसांनी शोध घ्यायला पाहिजे आणि आरोपींना अटक करून कडक कार्यवाही व्हायला पाहिजे
त्या लहान लहान मुलांना न्याय मिळाला पाहिजे आज रोजी त्यांच छत हरवले आहे वडील गेले आता आई गेली शासनाने त्यांची कुठे तरी शिक्षणाची सोय केली पाहीजे