Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsकुंभारी हनुमाननगर जि.प. मराठी शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

कुंभारी हनुमाननगर जि.प. मराठी शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

कुंभारी हनुमाननगर, दि. 15 ऑगस्ट
जिल्हा परिषद मराठी शाळा, कुंभारी हनुमाननगर येथे आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, शिक्षकवर्ग, तंटामुक्ती समिती अध्यक्ष, शाळा समिती अध्यक्ष, आजी-माजी सदस्य तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामपंचायत सदस्य सन्मां. ईश्वर जाधव यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि देशभक्ती व राष्ट्रीय एकतेचे महत्त्व पटवून सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांनी देशासाठी जबाबदारी, प्रामाणिकपणा आणि शिक्षणाची गरज यावर लक्ष केंद्रित करण्याचा संकल्प केला.

कार्यक्रमात लहान मुलांनी तोडक्या-मोडक्या शब्दांत आपल्या देशाप्रती प्रेम आणि आदर व्यक्त केला. देशभक्तीपर गीते, भाषणे आणि घोषणांनी शाळा परिसर देशप्रेमाने दुमदुमून गेला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापकांनी केले तर सूत्रसंचालन शिक्षकांनी केले. शेवटी उपस्थित मान्यवर आणि विद्यार्थ्यांनी एकमेकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 

– ईश्वर जाधव, DD NEWS PUSAD

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. D D News चे खुप खुप धन्यवाद कारण की आमच्या सारख्या तरुण पिढीला एका चांगल्या क्षेत्रात काम करण्याची संधी दिली आणि आमच्या गावच्या व आजूबाजूच्या गावातील गोर गरीब जनतेच्या समस्या या शासन दरबारी ठेवण्याचे व सर्व सामान्य जनतेला या D D News मार्फत न्याय देण्याचा काम आम्ही नक्की जबाबदारीने पार पाडू पुनश्च एकदा आमच्या पुसद संगणक परिचारक संघटनेचे अध्यक्ष श्रीमान. अरुण बर्डे सर जिल्हा उपाध्यक्ष D D News
    खुप खुप धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments