Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsश्री मनोहरराव नाईक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे पथनाट्य ठरले कौतुकास्पद | Earned Wide Appreciation

श्री मनोहरराव नाईक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे पथनाट्य ठरले कौतुकास्पद | Earned Wide Appreciation

“आरोग्य आणि समृद्धीची गुरुकिल्ली म्हणजेच स्वच्छता” या पथनाट्याने जिंकली प्रेक्षकांची मनं !

पार्डी,ता. पुसद – तालुकास्तरीय नाट्योत्सव स्पर्धेत श्री. मनोहरराव नाईक विद्यालय, पारडी शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचा अप्रतिम ठसा उमटवला.
“आरोग्य आणि समृद्धीची गुरुकिल्ली सर्वांसाठी स्वच्छता” हा समाजोपयोगी आणि सध्याच्या काळातील जिव्हाळ्याचा विषय घेऊन विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले.
या पथनाट्यातून सर्वांसाठी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देताना त्यांनी ग्रामीण भागातील दैनंदिन जीवनाशी निगडित वास्तव दाखवले.

पथनाट्याद्वारे त्यांनी संदेश दिला की – “स्वच्छतेतूनच आरोग्य आणि समृद्धीचा मार्ग खुला होतो. प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून परिसर, शाळा, गाव आणि समाज स्वच्छ ठेवला, तरच खऱ्या अर्थाने विकास साध्य होऊ शकतो.”
विद्यार्थ्यांचे प्रभावी संवाद, दमदार अभिनय आणि प्रसंगाचे उत्तम सादरीकरण यामुळे उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

शाळेतील कु. शिल्पा सतीश पवार, कु. श्रुती रामदास केवटे, कु. प्रतिभा धम्मा केवटे, कु. दिव्या संजय केवटे, पृथ्वीराज सुधीर पेंढारकर, ओमकार अंकुश परिस्कर, परमानंद धानोरकर व शुभम संतोष मते या विद्यार्थ्यांनी पथनाट्य साकारले.
तर मार्गदर्शक म्हणून बी. बी. आढाव सर यांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.

शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीने रंगमंचावर एक प्रभावी नाटिका साकार झाली. प्रेक्षकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि कौतुकाचे शब्द हे विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे खरे फलित ठरले.
शाळेच्या या यशामुळे पारडी परिसरात अभिमानाचे वातावरण असून, पुढील काळात या विद्यार्थ्यांकडून आणखी उत्तुंग यशाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी आणि त्यांच्या सर्जनशीलतेला दिशा मिळावी या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यंदाही विज्ञान नाट्योत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पुसद तालुक्यातील विविध शाळांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेला यावर्षी अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला होता. २१ ऑगस्ट २०२५ रोजी गुणवंतराव देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कवडीपूर (तांडा) येथे या तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

विद्यार्थ्यांसाठी विज्ञान हा विषय अधिक सोपा, रंजक आणि समजण्यास सुलभ व्हावा यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती. प्रादेशिक विद्या प्राधिकरण, नागपूर (राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था) आणि शिक्षण विभाग, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

  • अरुण बरडे, DD NEWS PUSAD
RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. विद्यार्थ्यांचे करावे तेवढे कवतुक कमी आणि आपल्या न्यूज चॅनेल चे ही आभार मुलांच्या कलागुणच कवतुक आपल्या बातमीच्या माध्यमातून केलं त्या बद्दल आपले मनापासून आभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments