पुसद –
ईसापुर (धरण) येथील सुरू असलेल्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाल्याने त्या रस्त्याचे काम तात्काळ सुरु करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
शेंबाळपिंपरी ते ईसापुर धरण या ३ किलोमीटर रस्त्याची गेल्या काही वर्षांपासून अतिशय दुरावस्था झाल्याने, येथील नागरिकांच्या वारंवार मागणी वरून हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सहक योजनेतंर्गत जवळपास २ कोटी रु. मध्ये मंजुर करण्यात आला. पुढील वर्षभरात थोडेफार काम करण्यात आले. मात्र काम अर्धवट झाल्यामुले या रस्त्याची मोठी दुरावस्था होवुन बसली. सध्या हा रस्ता म्हणजे मृत्युचा सापळा बनला आहे. बुटी, गोपवाडी, लोहरा, डोंगरगाव अशा अनेक गावांसह ईसापुर धरणाला जोडणारा हा मार्ग असल्याने वाहने तर सोडा सोडा साधे चालणेही अवघड होऊन बसले असल्याने या परिसरातील नागरिक त्रस्त झाले.
अनेक वेळा नामदार इंद्रनील नाईक सह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले मात्र कुठलाही फरक नाही. असे येथील लोकांचे म्हनने आहे. अखेर काल २१ एप्रिलला वंचित बहुजन आघाडीचे पुसद तालुकाध्यक्ष बुध्दरत्न भालेराव, शेंबाळपिंपरी सर्कल प्रमुख सर्जेराव मस्के, कासम खान (ईसापुर) यांनी रस्याचे थांबविलेले काम तात्काळ सुरु करण्यात येवून चांगल्या रस्त्याची निर्मिती करावी या मागणीसाठी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
यावेळी सरपंच अजमत खान, अनमोल ढोले, हाशु पठाण, सुदाम खडसे सह अनेक गावकरी उपस्थित होते. दुपार नंतर शाखा अभियंता सय्यद सिराज व ठेकेदारांच्या वतीने त्यांचा मुकदम यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन उपोषणकर्त्यांना तात्काळ रस्ता बनवुन देण्याचे आश्वासन दिले. मात्र उपोषणकर्त्यांनी जो पर्यंत रस्त्याचे काम सुरू होतं नाही तो पर्यंत उपोषण मागे न घेणार असल्याचे सांगितले. आता शासन पुढे का्य पाऊल उचलेल याकडे गावकरी मंडलीचे लक्ष लागले आहे.



