Thursday, February 19, 2026
Google search engine
HomenewsPusad : भीम टायगर सेनेच्या वतीने पत्रकार दिन साजरा | Raw...

Pusad : भीम टायगर सेनेच्या वतीने पत्रकार दिन साजरा | Raw Bharat

पुसद –

दिनांक सहा जानेवारी, रोजी भीम टायगर सेना पुसद तालुक्याच्या वतीने, विविध पत्रकार बांधवांचा सत्कार करून, पत्रकार दिन साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या प्रतिमेचे पूजन करून, प्रमुख  पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’, हे बाळशास्त्री जांभेकर यांनी, सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी, सुरू केले. हा दिवस बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिनही आहे. या दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा होतो.”

त्याच अनुषंगाने दरवर्षी प्रमाणे, याही वर्षी भिम टायगर सेना, पुसद तालुका च्या वतीने किशोर दादा कांबळे, भीम टायगर सेना जिल्हाध्यक्ष, यांच्या मुख्य नेतृत्वात शासकीय विश्रामगृह पुसद येथे, दैनिक वर्तमानपत्राचे पत्रकार प्रतिनिधी, तथा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार, यांचा विविध भेटवस्तू देऊन सामाजिक ऋण सत्कार, करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष,  पुसद पंचायत समिती चे गटविकास अधिकारी संजय राठोड साहेब,  प्रमुख अतिथी शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक केदार साहेब, वसंत नगर  पोलीस स्टेशनचे वेरूळकरसाहेब, नागेश कॅम्पुटर चे संचालक मिलिंद हट्टेकर,  ज्येष्ठ पत्रकार रवी देशपांडे, शकील पठाण, अर्जुन भगत, प्रज्ञापर्व समिती अध्यक्ष, बाळासाहेब कांबळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीता कांबळे,  इत्यादी सहित प्रमुख पाहुण्यांची व इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचे पत्रकार बंधू  उपस्थिती होती,

हा दिवस समाजात पत्रकारांच्या भूमिका आणि योगदानाचा पुनरुच्चार करणारा ठरला. समाजाला सत्य जाणून घेण्याचे महत्त्व पटवून देणे, ही पत्रकारांची जबाबदारी असून, त्यांच्या कार्यास पाठिंबा देणे, हे आपले कर्तव्य असल्याचा विचार, किशोर दादा कांबळे, भीम टायगर सेना जिल्हाध्यक्ष, यांनी या सोहळ्यात मांडला.

या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता जनार्दन झोडगे, दीपक गायकवाड, भीम टायगर सेना तालुकाध्यक्ष प्रभाकर खंदारे, भीम टायगर सेना प्रमुख प्रसिद्धी रवि शिंगणकर,  राजू पठाडे, प्रीतम आळणे, मधुकर ठोके, दत्ता कांबळे, संजय शेळके, विशाल डाके, सतीश जाधव, व भीम टायगर सेनेचे सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले,

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गायकवाडयांनी केले, तर,या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विष्णू सरकटे, यांनी मांडले, आभार प्रदर्शन गीता कांबळे यांनी मानले. 

कार्यक्रमाला प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातील अनेक पत्रकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांच्या कार्यासाठी सन्मानचिन्ह देवून, कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. भीम टायगर सेना यांनी केलेला, हा उपक्रम समाजाला पत्रकारितेचे मोल समजावून देणारा ठरला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments