आज दिनांक १०/१०/२०२४ रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटना शाखा अमरावती जिल्ह्याच्या वतीने नागरी सत्कार सोहळा व भव्य संगणक परिचालक मेळ्याव्याचे आयोजन आई भवानी सभागृह व लॉन कुरळपूर्णा (ता.चांदुर बाजार, जि. अमरावती) येथे आयोजित करण्यात आले होते.
या मेळाव्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती व अमरावती जिल्ह्यातील ग्रामपंचायत मध्ये आपले सरकार सेवा प्रकल्पाअंतर्गत कार्य करणारे सर्व संगणक परिचालक सहभागी झाले होते.
गेल्या ८ वर्षापासून आयटी विभागात अडकलेली फाईल केवळ २ तासात पंचायत राज व ग्रामविकास विभागात पोहोचून त्याच दिवशी शासन निर्णय निर्गमित होण्यासाठी तसेच संगणक परीचालकांसाठी झटणारे अचलपूर विधानसभेचे आमदार तथा दिव्यांग कल्याण विभाग (मंत्री दर्जा), माजी राज्यमंत्री व अध्यक्ष अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मा.ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांनी शासन स्तरावर संगणक परिचलकांची बाजू मांडल्याबद्दल अमरावती जिल्हा संगणक परिचालक संघटनेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात करण्यात आला. तसेच उपस्थित संगणक परीचालकांना बच्चूभाऊ कडू यांनी मार्गदर्शन करून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेचे राज्याध्यक्ष श्री.गुणवंतजी राठोड हे होते. त्याचबरोबर व्यासपीठावर वर्धा, वाशीम जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व अमरावती जिल्हा ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेचे अध्यक्ष श्री.सतीशजी सदार प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय विचार व्यक्त करताना राज्याध्यक्ष गुणवंतजी राठोड यांनी उपस्थित सर्व संगणक परीचालकांना एकजुटीने राहण्याचे आवाहन केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून संभ्रम पसरविणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहण्याचा सल्ला दिला. गेल्या १० वर्षात आंदोलने व मोर्चे करणे व संगणक परीचालकांना आर्थिक बाबित गुंतवून ‘डल्ला’ मारणाऱ्या लोकांपासून सावध राहा असे आवाहन केले.
सदरील कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणारे चांदुर बाजार ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेचे सर्व संगणक परिचालक तसेच कार्यक्रमाला उपस्थित राहणारे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद येथील संगणक परिचालक यांचे आभार व्यक्त करून कार्यक्रम संपन्नता करण्यात आली.