निसर्ग सर्वशक्तीमान आहे, हे आज त्यांने दाखवून दिले आहे. पुसद तालुक्यातील सर्वच ठिकाणी त्याचे उग्ररूप पहायला मिळाले. शनिवार दिनांक ३१ ऑगस्टच्या मध्यरात्री पासुन मुसळधार पाऊसाने सुरुवात केली होती. पार्डी, निम्बी, गाजीपुर, भोजला, येलदरी, जांबबाज़ार सह असंख्य गावांना पावसाने झोडपून काढले आहे. पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिके खरडुन गेली आहेत, शेतात पाणी साचले आहे. यामधे ओढ्या व नदीकाठच्या शेतीला जास्त फटका बसला आहे. शेतातील सर्व पिके, अवजारे ,शेतीउपयुक्त साहित्य, साठवलेले धान्य पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहुन गले आहे .
वेळेचे गांभीर्य पाहून तलाठी अमोल राठोड, ग्रामसेवक विजय ईसळकर सह ग्रामपंचायत पदाधिकारी यानी गावाना व शेतकरी बांधवाना भेटी देऊन प्राथमिक अहवाल शासनाला सादर करीत नागरिकांचे सांत्वन केले. व पुढील काही दिवस सतर्क राहन्याचे आवाहन केले.






