Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsपुसद येथे उमेदच्या शिवश्री महिला प्रभागसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

पुसद येथे उमेदच्या शिवश्री महिला प्रभागसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

पुसद –

आज दि. ११/०८/२०२४  रोजी शिवश्री महिला प्रभागसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती,  कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेलु प्रभागाचे प्रभाग समन्वयक विशाल नरवाडे यांनी केले, तसेच प्रभागसंघाचे लेखापाल तेजस्विनी ढोणे यांनी प्रभागसंघाचे ऑडिट वाचन केले.
यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ४१  समूहांना CIF समुदाय गुंतवणूक निधी वाटप करण्यात आला, तसेच गाव पातळीवरील सर्व कॅडर यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले, त्याचबरोबर उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या सर्व कॅडर आणि उत्कृष्ट उद्योजक यांना शिल्ड ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले, नंतर प्रभागसंघाचे पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त केले, 


 
तालुका अभियान व्यवस्थापक श्री कांबळे सर, तालुका व्यवस्थापक श्री राठोड सर, तालुका व्यवस्थापक श्री अर्शद सर यांनी महिलांना उमेद अभियानातील विविध योजनाविषयी सविस्तर माहिती दिली. सभेला  सर्व प्रभाग समन्वयक, IFC अँकर, सर्व CLFM, सर्व CAM, सर्व CLM उपस्थित होते, 

सभेचे सूत्रसंचालन नीता कलाने (ICRP), तेजस्विनी ढोणे (CLFA)आणि वैशाली बोडखे (CLFM) यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता गाव पातळीवरील सर्व कॅडर आणि उमेद अभियानातील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

बातमी आवडल्यास…. Like 👍 comment करा.

आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी कृपया संपर्क करा.

रवी शिंगनकर (संपादक) –  मो. नं. – 8605 462 350

अरुण बरडे (सह-संपादक) – मो. नं. – 9921 722 726

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments