अमरावती येथे पार पडलेल्या नृत्यस्पर्धेत येथील नृत्यांगणी यशस्वी राठोड हिने उत्कृष्ट कला सादर करुन तृतीय क्रमांक पटकावीत पुसदच्या नावलौकीकात भर टाकली.
हरिझोन कम्प्युटर टायपिंग अँड शॉर्टहँड इन्स्टिट्यूट आणि सिटी न्यूज प्रस्तुत विदर्भस्तरीय भव्य नृत्य स्पर्धा नुकतेच अमरावती येथील सांस्कृतिक भवनात मोठ्या उत्साहात पार पडली.
आयोजित विदर्भस्तरीय स्पर्धेमध्ये एकूण तीन गट तयार करण्यात आले होते. त्यामध्ये ७ ते १४ वयोगटांमध्ये पुसद येथील नृत्य, हिप हॉप डान्सर अरिफ खान यांच्या मार्गदर्शनात श्रीरामपूर येथील नृत्य शिकणारी कु. यशस्वी साहेबराव राठोड हिने या विदर्भस्तरीय स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटकावून पुसदचा डंका वाजवून नावलौकिकात भर टाकली आहे.
याप्रसंगी तिला मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह , प्रमाणपत्र,भेटवस्तू व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. तिने आपले यशाचे श्रेय गुरु अरिफ खान व आई-वडिलांना दिले आहे.
अरिफ खान हे पुसद मध्येच नाही तर इतर ठिकाणी सुद्धा नृत्य दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध आहेत.
भव्य विदर्भस्तरीय नृत्य स्पर्धेचे परीक्षण द किंग युनायटेड ग्रुप मेंबर मुंबई सेलिब्रिटी आरिफ खान तथा लावणी प्रिन्स शुभम बोराडे फेम स्टार प्रवाह उपविजेता यांनी केले.या स्पर्धेच्या आयोजनासाठी लीना गावनेर वासनिक व मानसी गणवीर यांच्या ट्रस्टने पुढाकार घेतला.



