पार्डी येथे वृक्षारोपण
पुसद –
निसर्ग हे एक देवाचे दुसरे रूप असून सम्पूर्ण विश्व त्याने व्यापलेले आहे. वृक्षांची कमी होत असलेली संख्या जगासाठी मोठी समस्या घेऊन येत आहे. हा मुख्य उद्देश समोर ठेउन सत्यसाई सेवा समिती पुसद यांच्या वतीने पार्डी येथील स्मशानभूमीत वृक्षलागवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच उषाबाई जाधव होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून सचिव विजय इसलकर, समाधान केवटे, राजू मोरे, रामदास केवटे, विक्की झरकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष विठ्ठल जाधव उपस्थित होते. यावेळी स्मशानभूमीत २५० वृक्षांची लागवड केली. गजानन अडगुलवार, डॉ. संदीप चव्हाण, प्रकाश राठोड, बालाजी बंधेवार, बंदेवार, अनिल जागृत, प्रदीप तोरडमल, प्रकाश राठोड, नीता अडगुलवार, ममता चव्हाण, किरण राठोड आदींनी पुढाकार घेतला.
बातमी आवडल्यास…. Like 👍 करा.
चॅनेल subscribe करा.
आपल्या बातम्या व जाहिराती देण्यासाठी कृपया संपर्क करा.
रवी शिंगनकर (संपादक) – मो. नं. – 8605 462 350
अरुण बरडे (सह-संपादक) – मो. नं. – 9921 722 726
धन्यवाद…..




