पुसद प्रतिनिधी –
सम्राट अशोक महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांच्या वतीने धम्मक्रांती प्रज्ञा पर्व कार्यक्रमात नितीन सावंत यांचे व्याख्यान झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. मोहम्मद नदीम हे होते. प्रमुख अतिथी अनुकूल चव्हाण, दिगंबर जगताप, सुखदेव भगत, विलास भवरे, संदीप मैराळ पाटील, सतीश नांदगावकर, जियाभाई अर्जुन भगत विचार पिठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषाच्या फोटोचे पूजन करण्यात आले. परिवर्तन बहुउद्देशीय महिला मंडळ आणि पारामीता महिला मंडळ यांनी बुद्ध वंदना सादर केली. या देशात दोन चळवळी कार्यरत आहेत एक पुरोगामी आणि दुसरी प्रतिगामी. पुरोगामी चळवळ ही तथागत भगवान गौतम बुद्धापासून सुरू झाली वारकरी संप्रदायाने ती पुढे नेली महात्मा फुलेंनी या चळवळीला गती दिली या चळवळीत बाबासाहेबांनी अतिशय मोलाचे कार्य केले आहे.
सनातनी धर्मावर कडाडून विरोध करणारे, छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून त्यांची पहिली शिवजयंती साजरी करणारे महात्मा ज्योतिबा फुले समाजातील शिक्षण,आरोग्य,बेरोजगारी यांसारख्या ज्वलंत प्रश्नांवर त्यांनी येथे विनोदात्मक पद्धतीने टीका करत तरुणांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,संत कबीर यांच्या विचारांकडे नेण्याचा व त्यावर चालण्याचा उपदेश केला.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन बाळासाहेब कांबळे यांनी केले तर आभार नारायण ठोके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धममक्रांती प्रज्ञा पर्वाचे अध्यक्ष अर्जुन भगत, कार्याध्यक्ष देवेंद्र खडसे, सचिव शरद ढेंबरे, उपाध्यक्ष बाबाराव उबाळे, ल.पू. कांबळे. विजय निखाते. सहसचिव आर.पी. गवई, भालेराव मिलिंद जाधव. राहुल पाईकराव, निर्भय गायकवाड, विजय पाटील, प्रमोद धुळे, बुधाजी जमदाडे, मधुकर सोनवणे, हेमंत इंगोले, सनी पाईकराव, अर्जुन केळकर, राजू कांबळे, आनंद खडसे, अक्की पाईकराव, दौलत हाडसे, संजय वाढवे, प्रीतम आळने, उत्तम कांबळे, सुभाष गायकवाड, बाळासाहेब कांबळे, संदीप कांबळे, भारत कांबळे, सुरेश कांबळे, व धम्मक्रांती प्रज्ञापर्व समितीने अथक परिश्रम घेतले.





