Friday, February 20, 2026
Google search engine
Homenewsबेलोरा येथील श्री शिवाजी विद्यालय येथे विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन

बेलोरा येथील श्री शिवाजी विद्यालय येथे विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन

बेलोरा येथील श्री शिवाजी विद्यालय येथे विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन

पुसद प्रतिनिधि : – 

          बेलोरा येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक पंडीतराव मस्के तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक दत्तराव जीवने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून व त्यांना वंदन करून करण्यात आली. तसेच प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 

         क्रीडा महोत्सव कार्यक्रमाची प्रस्तावना भास्कर मुकाडे यांनी केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडितराव मस्के यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व समजावून सांगितले. मैदानी खेळामुळे आपल्या शरीराचा चांगला व्यायाम होतो. तसेच आपले शरीर बळकट बनते. सामूहिक खेळामुळे सांघिगवृत्ती वाढते, भेदभाव नष्ट होतो. तसेच विविध खेळांमध्ये आपण प्राविण्य मिळवून आपल्या गावाचे नाव त्याच बरोबर आपल्या विद्यालयाचे नाव जिल्हा पातळी व राज्य पातळी पर्यंत नेऊ शकतो हे सांगितले. 

          यावेळी ‘गोळाफेक, थाळीफेक ह्या स्पर्धा घेऊन सुरुवात करण्यात आली. तसेच मुलींची लंगडी, संगीत खुर्ची, खो – खो,रांगोळी स्पर्धा तसेच कबड्डी 100 मीटर धावणे स्लो सायकल, उंच उडी-लांब उडी, सुईदोरा ओवणे लिंबू चमच, गीतगायन, भाषणस्पर्धा इत्यादी खेळाचे वेळापत्रक देऊन हे खेळ घेतले जातील असे जाहीर करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व ओसंडून वाहत होता. 

         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शालिग्राम वाघमारे यांनी केले व आभार प्रदर्शन संजय असुदे यांनी केले. या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थ्यांसह सर्व कर्मचारी बंधू/ भगिनी व काही विद्यार्थ्यांचे पालक आवर्जून उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना संत्रागोळ्या खाऊ म्हणून वाटप करण्यात आले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments