महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटना AWB/3466 च्या राज्याध्यक्षा सुनीताताई किशोर आमटे ह्या गेल्या 16 जानेवारीपासून जिल्हा परिषद सातारा येथे आमरण उपोषण करत आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे त्यांची तब्येत खालावत चाललेली आहे परंतु आतापर्यंत कुचकामी शासनाने व प्रशासनाने कुठलेही दखल घेतलेली नाही, उलट सातारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपोषण मोडीत काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. परंतु उपोषण करते सुनीताताई उपोषणास ठाम आहे. दोन दिवस जिल्हा परिषदचे मुख्य गेट बंद करून घेतले होते, आणि पाठीमागील गेट मधुन त्यांना बाथरूमला जाण्यासाठी खूप त्रास होत होता. परंतु त्यांनी तेही त्रासावर मात करून आपले उपोषण चालू ठेवलेले आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी साहेबांनी ताईंच्या प्रतिनिधींना अर्वाच्य भाषेत बोलून त्यांच्या केबिन मधून बाहेर काढले असे मत संगणक परिचालक यानी मांडले आहे. तरीसुद्धा सुनीताताई उपोषणास ठाम आहेत. जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत जिल्हा परिषद सातारा च्या फूटपाथ वरून उठायचे नाही त्यांचे म्हणणे आहे. एक तर माझी अंतयात्रा निघेल किंवा संगणक परिचालकाला न्याय मिळेल एवढाच पर्याय त्यांनी शासनासमोर ठेवलेला आहे. शिवाय जर 26 जानेवारी पर्यंत निर्णय लागला नाही तर सर्व संगणक परिचालकासह सामूहिक आत्मदहन सुद्धा त्या करणार आहेत. तसे पत्र संगणक परिचालकांनी सातारा शहर पोलीस स्टेशनला दिलेले आहे. तेव्हा शासनाने निर्णय लवकरात लवकर द्यावा अन्यथा पुढील अनुचित प्रकाराला शासन व प्रशासन जबाबदार राहील. असे म़त त्यानी व्यक्त केले आहे.
सातारा सारख्या पावन भूमीत एका स्त्रीला एवढ्या खालच्या दर्जाची वागणूक सातारा येथील स्थानिक प्रशासन देत आहे, आणि या पावन शहराला कलंकित करत आहे. सातारा या ऐतिहासिक भूमीत आमच्या या न्याय, हक्काच्या, शांततेच्या, अहिंसेच्या लढाईला न्याय मिळणार का ? व आमच्यावर होणाऱ्या अन्यायाकडे कुणी लक्ष देणार का ? असा प्रश्न महाराष्ट्रातील असंख्य संगणक परिचालक करत आहेत ….




