Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsग्रामपंचायत कॉम्पुटर ऑपरेटर नंतर आता पं. स. ब्लॉक मॅनेजर सुद्धा संपावर....

ग्रामपंचायत कॉम्पुटर ऑपरेटर नंतर आता पं. स. ब्लॉक मॅनेजर सुद्धा संपावर….


पुसद – यवतमाळ जिल्हातील सर्व ब्लॉक मॅनेजर (Bm) सह पुसद तालुक्यातील (Bm) सुद्धा संपावर गेले आहेत. त्यांनी मागण्यासंदर्भात मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ यांना निवेदन दिले. 

            ग्रा.प. केंद्रचालक जो पर्यंत कामावर येणार नाहीत तो पर्यंत आम्ही कामावर येणार नाही या प्रमुख मागणी सह इतर अनेक मागण्यासाठी त्यांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे.
        ग्रा. प. ऑपरेटर व ब्लॉक मॅनेजर ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावरील ऑनलाईन कामकाज करण्यात मोलाची भूमीका बजावत असतात. त्यांच्या कामबंदमुळे गावातील नागरीकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून ग्रा.पं. व पं.स. स्तरावरील कामकाजावर त्यांचा फार मोठा परिणाम पडला आहे, ग्रा. पं. व पं. स. स्तरावरील विविध दाखले, 15 वा वित्त आयोगाचे पेमेंट, सरपंच/उपसरपंच व कर्मचारी यांचे पेमेंट, ठेकेदारांची बिले, ई-टेंडरिंग, ऑनलाईन सभा VC ई. कामांवर त्यांचा फार मोठा परिणाम पडत आहे.

        परिणामी शासनाने त्यांच्या रास्त मागण्या त्वरित मंजूर कराव्यात, अन्यथा चालू असलेले आंदोलन लोकशाही मार्गाने तीव्र करण्यात येईल, असा ईशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. अशी माहिती पुसद तालुका अध्यक्ष अरुण बरडे व तालुका व्यवस्थापक अमोल मिराशे यांनी दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments