पुसद – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार (Sharadchandra Pawar) गटाचे प्रदेश सरचिटणीस शरद मैद (Sharad Maind) यांच्या नेतृत्वात, पुसद येथील कृषि उत्पन्न बाजार समिती प्रांगणात भरणाऱ्या भाजी मंडीतील परिस्थितीची पाहणी केली. त्यावेळी तेथील घाणीचे साम्राज्य पाहता पुसद (Pusad) तालुक्यातील नागरिक भाजीपाला व फळाच्या रुपात विष विकत घेत असल्याचे दिसून आले. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्वत्र चिखल (Mud) होऊन सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरलेले होते. याच घाणीत शेतकरी (Farmer) आपला माल ठेऊन आपल्या मालाची हर्राशी करीत असतात. या घाणीच्या साम्राज्यामध्ये मच्छर व अन्य विषारी बिनविषारी कीटकांच्या सानिध्यात सकाळी ५ वाजल्यापासून हर्रासी सुरु असते. हाच माल छोटे मोठे व्यापारी (Businessman) खरेदी करून त्याला कसेबसे साफसूफ करून विक्री करतात. तो माल आरोग्याच्या दृष्टीने कितपत खरा उतरतो हे येथील चित्र पाहिल्यावर लक्षात येते. तालुक्यातीत अनेक शेतकरी शेतीला आर्थिक (Economical) हातभार लागावा म्हणून भाजीपाला उत्पादन करून भल्या पहाटे उठून कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील मंडित आणतात. या ठिकाणी त्यांना असंख्य असुविधांचा (inconveniences) सामना करावा लागत आहे.
या सर्व समस्यांना (Problems) वाचा फोडण्याकरिता व त्यावर उपाययोजना करण्याकरिता शरद मैंद यांनी ठोस असे पाऊल उचलले. या संपूर्ण परिसरात मजबूत कॉक्रिटीकरण, शुद्ध पिण्याचे पाणी, प्रसाधन गृह, विजेची सोय तात्काळ उपलब्ध करून ध्यावी, अन्यथा भव्य दिव्य असे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा (warning) शरद मैंद यांनी दिला.
यावेळी त्यांचेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे मागील १८ वर्षा पासून वरील असुविधा बाबत अनेक राजकीय व सामाजिक संघटना, तसेच विविध वर्तमानपत्रातुन (News Paper) आवाज उठविल्या गेला. मात्र बाजार समिती, लोकप्रतिनिधी (Leader) यानी आजपर्यंत दुर्लक्ष करत गेले, हे विशेष.