Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsपुसद तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती झाल्या ऑफ़लाईन

पुसद तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती झाल्या ऑफ़लाईन

१६ ऑगस्ट पासून ग्रामपंचायत संगणक परीचालक यांचे काम बंद आंदोलन.

 

पुसद – 

मागील बारा वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणक परिचालक यानी त्यांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात १६  ऑगस्ट  पासून काम बंद करूंन  २८ ऑगस्ट रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन आज पुसद पंचायत समितीचे गटविकास अधिकरी याना दिले. 

शासनाने दरवेळेस आम्हाला आश्वासनाचे गांजर दाखवुन, आमच्या पाठीत नेहमीच खंजर खुपसून धोका दिलेला आहे. मात्र यावेलेस आम्ही कोणत्याही भूलथापाना  बली न पड़ता आमचा हक्क मिळवु असा निर्धार पुसद तालुकाध्यक्ष अरुण बरडे यांनी व्यक्त केला. 

निवेदन देताना पुसद संघटनेचे उपाध्यक्ष सचिन ठाकरे, ईश्वर जाधव, सचिव शरद पवार, कमीटी सदस्य तसेच तालुक्यातील सर्वच संगणक परिचालक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments