Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsबसस्थानकात महिला बस वाहकाचा आत्महत्येचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली

बसस्थानकात महिला बस वाहकाचा आत्महत्येचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळली

पुसद (प्रतिनिधी) :
पुसद शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या एसटी बसस्थानक परिसरात एका महिला बस वाहक यांनी गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना गुरुवार, दि. ७ ऑगस्ट रोजी घडली. मात्र, तेथे उपस्थित नागरिक आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

महिला बस वाहक सविता बाळकृष्ण ससाणे (वय ३५ वर्षे) यांनी बसस्थानकाच्या आवारातील झाडावर चढून गळफास लावण्याचा प्रयत्न केला. ही घटना एका सतर्क ऑटोचालकाच्या लक्षात येताच त्याने धाव घेत तात्काळ हस्तक्षेप करून त्या महिलेला रोखले. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे हे पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या मदतीने त्या महिला बस वाहकाला झाडावरून खाली उतरवण्यात आले आणि तात्काळ उपचारासाठी पुसद येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

प्राथमिक माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी संबंधित महिला वाहकावर एका शाळकरी मुलीने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी तिच्यावर एनसी (नॉन-कॉग्निझेबल) गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामुळे त्या मानसिक तणावात येऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.

सुदैवाने, वेळीच झालेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे महिला बस वाहकाचा जीव वाचला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस विभागाकडून महिलेचे समुपदेशन करण्यात आले असून, पुढील तपास शहर पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.

– अरुण बरडे DD NEWS PUSAD

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments