Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsसाहित्य, पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल सुरज पवार यांना ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार

साहित्य, पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल सुरज पवार यांना ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार

पुसद  : साहित्य, पत्रकारिता आणि प्रकाशन क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणारे प्रसिद्ध साहित्यिक, कवी व पत्रकार सुरज सुधाकरराव पवार यांना ‘महाराष्ट्र रत्न’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इमेज इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स यांच्या वतीने हा पुरस्कार १ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रदान करण्यात आला.

ठाणे येथील रेघे सभागृहात पार पडलेल्या या दिमाखदार सोहळ्यात मनोरंजन, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. प्रसिद्ध अभिनेते दीपक जोशी यांच्या हस्ते आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सुरज पवार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सुरज पवार यांनी साहित्यिक, कवी, पत्रकार तसेच प्रकाशक म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत इमेज इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून त्यांची ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. साहित्य लेखनासोबतच पत्रकारिता व प्रकाशन क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

यापूर्वीही विविध पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या सुरज पवार यांच्या शिरपेचात या पुरस्कारामुळे आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

पुरस्कार स्वीकारताना सुरज पवार यांनी, “हा सन्मान माझ्या लेखणीचा आणि वाचकांच्या प्रेमाचा आहे,” अशी भावना व्यक्त केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments