पुसद –
दिनांक ३० जानेवारी २०२५ रोजी पुसद येथील मुख्यमंत्री माझी शाळा सुन्दर शाळा तालुक्यातून तृतीय क्रमांक प्राप्त शाळा गुलाम नबी आझाद उर्दू हायस्कूल मध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात वर्ग ८ ते ९ वीच्या विद्यार्थ्यांनी मराठी भाषेत “शिक्षणाचे महत्त्व” केंद्रीय संकल्पनेवरील स्त्री शिक्षण, आधुनिक शिक्षण, शिक्षण आणि समाज, शिक्षण प्रवर्तनाचे साधन,पवित्र कुरआन आणि शिक्षण, प्रेषित मुहम्मद स.स यांचे शिक्षण विषय विचार, शिक्षणामुळे होणारी प्रगती, मुस्लिम समाज आणि शिक्षक, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, मुलींचे शिक्षण, माझा देश, महाराष्ट्र माझा, अशा अनेक विषयावर इयत्ता ८ वि व ९ वीच्या एकूण ३८ विद्यार्थ्यांनी मराठीत भाषण उत्कृष्ट असे भाषण प्रस्तुत केले.भाषण स्पर्धेतील उपस्थित परीक्षकांनी उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या भाषणाला पाहून त्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तारीक खान सर होते, तर परीक्षक म्हणून प्रा. गोटे सर, शेख नईम सर, प्रा.पठाण सर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता ९ वी ची विद्यार्थिनी शाजीया परवीन हिने केले.
कार्यक्रमाचे आयोजन तसेच मराठी भाषण स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची तयारी सैय्यद सलमान सरांनी केली तसेच सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मुख्याध्यापक मोहम्मद सादिक शेख सरांचे मार्गदर्शन लाभले. नियोजनात सर्वच शिक्षकांचे सहकार्य लाभले.



