Thursday, February 19, 2026
Google search engine
HomeCrimeकाटखेडा फाटा अपघातात १ ठार तर लहान मुलासह १ जखमी

काटखेडा फाटा अपघातात १ ठार तर लहान मुलासह १ जखमी

पुसद –

आज काटखेडा फाट्याजवळ दुचाकीला बोलेरो वाहनाने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अपघातात दुचाकी स्वराची पत्नी आणि ९ वर्षाचा नातू गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपजिल्हा शासकीय रुग्णालय पुसद येथे  उपचारासाठी हलविण्यात आले आहे. या अपघातात एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

प्राप्त माहितीनुसार, पुसद ग्रामीण पोतीस स्टेशनच्या हद्दीतील महागाव तालुक्यातील  वडद येथील अरुण आडे हे आपल्या स्कुटी क्रमांक एम एच २९ बीआर ४३८९ दुचाकीवरून पत्नी तिलाबाई आडे, व नातु प्रसिद्ध गुरुदत्त आडे हे काटखेडा फाटा मार्ग पुसद तालुक्यातील येरंडा येथे नवसाच्या कार्यक्रमावर जाण्यासाठी निघाले होते. दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास महागाव वरून पुसदकडे केळी भरून येणाऱ्या बोलोरो पिकअप वाहन क्रमांक एम एच ३७ टि ३४२५ या वाहनाने काटखेडा फाट्याजवळ जवळ त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली.  या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर दुचाकीस्वराची पत्नी व नातू गंभीर जखमी झाले आहेत. पिकअप धडक देऊन पसार झाला होता. परंतु सदर पिकअप पी एन कॉलेज जवळ पकडण्यात आला. दारव्हा येथील रहिवासी असलेल्या चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. 

सदर अपघात झाल्याची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत साहेब व वाहतूक उपशाखेच्या पथकाला मिळाली असता, त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. सोबतच जखमींना पुसद येथील रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले. अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकी स्वारास शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा शासकीय रुग्णालय पुसद येथे दाखल केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.  पुढील कार्यवाही सुरु आहे. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments