पुसद –
आज दि. १६/०८/२०२४ रोजी नारीशक्ती महिला प्रभागसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. सदर सभेला माननीय आमदार इंद्रनील भाऊ नाईक, मोहिनी ताई नाईक, मा.सरपंच काळबांडे ,उपसरपंच ,व इतर मान्यवर उपस्थित होते. प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलनन करण्यात आले. त्याचबरोबर कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीरामपूर प्रभागाचे प्रभाग समन्वयक नुतन खिल्लारे यांनी केले, माननीय आमदार इंद्रनील भाऊ नाईक यांनी महिलांना मार्गदर्शन केले. महिलांनी माननीय आमदार इंद्रनील भाऊ नाईक यांना राख्या बांधल्या.
त्यानंतर प्रभागसंघाचे लेखापाल यांनी प्रभागसंघाचे ऑडिट वाचन केले, व सभेमध्ये समूहांना CIF समुदाय गुंतवणूक निधी वाटप करण्यात आला, तसेच गाव पातळीवरील सर्व कॅडर यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर सभेत तालुका अभियान व्यवस्थापक श्री कांबळे सर, तालुका व्यवस्थापक श्री राठोड सर ,हर्षद सर यांनी महिलांना उमेद अभियानातील विविध योजनाविषयी सविस्तर माहिती दिली. सभेमध्ये प्रभाग समन्वयक, सर्व CLFM, सर्व CAM, सर्व CLM उपस्थित होते, कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता गाव पातळीवरील सर्व कॅडर आणि उमेद अभियानातील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या सभेचे सूत्रसंचालन बबीता सोनटक्के (CLFM) यांनी केले.





.jpeg)

