Thursday, February 19, 2026
Google search engine
HomeCrimeप्रेमीयुगलाचा संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह - मांडवा, पुसद #RawBharat

प्रेमीयुगलाचा संशयास्पद स्थितीत आढळला मृतदेह – मांडवा, पुसद #RawBharat

विहिरीत प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळल्याने खळबळ

पुसद प्रतिनिधी :

           पुसद शहरापासून जवळच असलेल्या मांडवा
येथे शेतातील विहिरीत प्रेमीयुगलांचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ
उडाली. प्राप्त माहितीनुसार
, मांडवा
येथील रहिवाशी असलेला सुरेश अनिल राठोड वय २२ वर्ष व आरती ज्ञानेश्वर साखरे वय १७
वर्ष रा. मांडवा हे दोघे प्रेमीयुगल असुन दि. ५ ऑगस्ट २०२४ रोजीच्या रात्री
दरम्यान पळून गेले होते.

          परंतु आज दि. ७ ऑगस्ट रोजी आरती
ज्ञानेश्वर साखरे हिचे आजोबा भागोराव तुकाराम साखरे यांच्या शेतात सकाळी ११
वाजताच्या सुमारास रोजमजूर कामाकरीता गेला असता त्यास भागोराव साखरे यांच्या शेतातील
विहिरीत या दोघांचा मृतदेह आढळून आला. दोघांच्या कमरेला नॉयलोनच्या पिवळ्या दोरीने
बांधण्यात आले होते. या घटनेची माहिती गावात पसरताच तात्काळ गावकरी तिथे हजर झाले.
सदर घटनेची माहिती ग्रामीण पोलिस स्टेशनला देण्यात आली. घटनेची माहिती कळताच
ग्रामीण पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दोघांच्या मृतदेहास बाजीच्या सहाय्याने
विहिरीतून बाहेर काढण्यात आले.

           प्रथमदर्शनी मृतदेहास बघितले असता
अंदाजे दोन दिवसांआधी ही घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला. सदर
मृतदेह शासयकी उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदनाकरीता आणण्यात आले आहे. सदर
प्रेमीयुगल दोरीने एकमेकांस घट्ट बांधलेल्या अवस्थेत आढळल्याने वेगवेगळ्या चर्चेला
 उधाण आले आहे.

ब्युरो रिपोर्ट Raw
Bharat News

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments