Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsपार्ङी येथील श्री मनोहरराव नाईक विद्यालयात मुलींना मोफत सायकलीचे वाटप | Distribution...

पार्ङी येथील श्री मनोहरराव नाईक विद्यालयात मुलींना मोफत सायकलीचे वाटप | Distribution of free bicycles to girls #rawbharat

पार्ङी येथील श्री मनोहरराव नाईक विद्यालयात मुलींना मोफत सायकलचे वाटप

पार्ङी पुसद – 

पुसद तालुक्यातील पार्ङी  येथील श्री. मनोहरराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुलींना मानव संसाधन कार्यक्रमांतर्गत 44 मुलींना मोफत सायकलीचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच उषाबाई जाधव ह्या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून ग्रा.प.सदस्य समाधान केवटे कंप्यूटर ऑपरेटर अरुण बरङे. सदस्य सुनील राठोड, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विठ्ठल जाधव, संस्थेचे अध्यक्ष गजानन मोगरे, उपाध्यक्ष कैलास चंद्रवंशी, सचिव प्रमोद चंद्रवंशी, सहसचिव नामदेवराव इसलकर, मुख्याध्यापक संतोष सोनोने, सुहास जाधव, देविदास झरकर, सचिन सवई, शेख लतीफ., मंदा भगत उपस्थित होते. 

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेतील ४४  मुलींना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सायकलचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन दारासिंग चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाला आढाव सर रशीद सर तिडके सर व शाळेतील शिक्षक व ईतर कर्मचारी व  विद्यार्थी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments