Thursday, February 19, 2026
Google search engine
HomeCrimeदेशी कट्टा बाळगणारा ताब्यात .. स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई

देशी कट्टा बाळगणारा ताब्यात .. स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई

पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण हददीतील मौजे-वडगांव येथुन देशी कटटा बाळगणा-यास ताब्यात घेवून केला देशी कटटा (गावठी बनावटीची पिस्टल) हस्तगत स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कारवाई


पुसद – 

दिनांक 21/07/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकास गुप्त बातमीदाराव्दारे माहिती मिळाली की, मौजे वडगाव ता. पुसद येथील गौरव विनोद चव्हाण यांच्याकडे गावठी बनावटीचा देशी कटटा असून तो मांगीलालदादा नगर विटावा वार्ड पुसद येथे आलेला आहे अशी गोपनिय माहिती मिळाल्याने पथकाने तात्काळ मांगीलालदादा नगर विठावा वार्ड पुसद येथे रवाना होवून माहिती प्रमाणे इसमाचा शोध घेवुन त्यास ताब्यात घेतले. व त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव गौरव विनोद चव्हाण वय 20 वर्षे रा.वडगाव ता. पुसद जि. यवतमाळ असे सांगितले. त्यास गावठी बनावठीचे देशी कटटा बाबत विचारपुस केली असता त्याने गावठी बनावठीचा देशी कटटा त्याचा मित्र शैलेश प्रल्हाद चव्हाण रा. वडगांव यांच्याकडे दिला असल्याचे सांगितल्याने वडगांव ता. पुसद येथे जावून शैलेश प्रल्हाद चव्हाण वय 24 वर्षे, रा. वडगाव ता. पुसद यास ताब्यात घेवून त्यास गावठी बनावटीचा देशी कटटा बाबत विचारपुस केली असता सदर गावठी बनावठीचा देशी कटटा घरात ठेवला असल्याचे सांगून त्याने त्याचे राहते घरातून पंचा समक्ष एक गावठी बनावटीचा देशी कटटा काढून दिल्याने तो जप्त करुन ताब्यात घेतला. त्यानंतर सदरचा देशी कटटा कोणाचा आहे व कोणाकडून घेतला याबाबत गौरव विनोद चव्हाण यास विचारपुस केली असता त्याने सांगितले कि, सदरचा देशी कटटा हा त्याने त्याचा मित्र अतिष ऊर्फे कावा विनोद राठोड रा.वडगाव याने त्यास दिला असून देशी कट्याचे दोन राऊड (काडस्तुस) त्याचेकडे आहे असे सांगितल्याने त्याचे बाबत गावात माहीती काढली असता तो कामानिमित्त पुणे येथे गेला असल्याचे समजले.


गावटी बनावटीचा देशी कटटा बाळगणारे 1) गौरव विनोद चव्हाण वय 20 वर्षे रा. वडगाव ता. पुसद जि. यवतमाळ 2) शैलेश प्रल्हाद चव्हाण वय 24 वर्षे, रा.वडगाव ता. पुसद जि. यवतमाळ यांचे कडून दोन मोबाईल व एक गावठी बनावठीचा देशी कटटा असा एकूण 60,000 रु मुददेमाल जप्त करुन ताब्यात घेतला असून नमुद दोन्ही आरोपी व पाहीजे असलेला आरोपी 3) आतिष ऊर्फ कावा विनोद राठोड वय 18 वर्षे, रा. वडगांव ता पुसद जि. यवतमाळ यांचे विरुध्द पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25, 35 अन्वये गुन्हा नोंदीसह कार्यवाही करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ. श्री. पवन बन्सोड सा, मा अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ  श्री पियुष जगताप सा तसेच मा उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अति पोलीस अधीक्षक श्री पंकज अतुलकर सा, मा.पोलीस निरीक्षक श्री, ज्ञानोबा देवकाते, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सपोनि गजानन गजभारे, चापोउपनि रेवण जागृत, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा/ रमेश राठोड, पोशि/मोहम्मद ताज सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments