व्हाँईस आँफ मिङिया पत्रकार संघटना यवतमाळ आयोजीत करणार विविध कार्यक्रम
पुसद प्रतिनिधी –
यवतमाळ येथील विश्रामगृह येथे आज व्हाँईस ऑफ मीडिया पत्रकार संघटना यवतमाळ यांच्या वतीने सर्वसाधारण सभा घेण्यात आली. या सभेचे अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष संजय राठोड हे होते. प्रमुख अतिथी म्हणून राज्य संघटक सुरज पाटील हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सभेचे प्रास्ताविक संघटनेचे प्रसिद्धीप्रमुख अरुण बरङे यांनी केले.
सभेमध्ये व्हाँईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने जुले महिन्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे ठरविन्यात आले. यामधे संघटनेच्या वतीने, सदस्यांच्या दहावी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार, आरोग्य तपासणी, जीवन विमा पॉलिसी काढणे, संघटनेचे नियुक्तीपत्र देणे, ओळखपत्र देणे, याबाबत व सामाजिक उपक्रम राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. व उपक्रम राबविन्याचे सर्वानुमते ठरविन्यात आले.
या सभेला पुसद तालुक्याचे उत्कृष्ट तालुकाध्यक्ष पुरस्कार प्राप्त समाधान केवटे. जय राठोङ. संजय राऊत. विश्वास काळे. सचिन उबाळे.दिनेश करमुले. अब्दुल शेख. गणेश राऊत. प्रेमदास चव्हाण. संतोष मामीङवार. राजेश धोटे. अरुण बरङे सह जिल्हातील सर्व तालुकाध्यक्ष उपस्थित होते.
– सह संपादक – अरुण बरडे मो. नंबर – ९९२१७२२७२६