प्रेम – वाद आणि खून … लॉज मधे आढळला मृतदेह
पुसद प्रतिनिधी –
पुसद शहरातील मोतीनगर लगत असलेल्य शनीमंदिर परिसरातील पंजाब नॅशनल बँक समोरील लॉज मध्ये दि.७/०६/२०२४ रोजी सायंकाळी ९ वाजताच्या दरम्यान एका विवाहित महिलेचा नग्नावस्थेतील मृतदेह आढळल्याने सर्वत्र एककच खळबळ उडाली आहे. सौ. सपना संजय मोरे असे मृतक विवाहित महिलेचे नाव आहे.
पुसद तालुक्यातील बोरगडी ग्रामपंचायत येथील सपना लक्ष्मण पाईकराव वय 23 वर्ष हिचा विवाह पुसद तालुक्यातील निंबी येथील संजय प्रदीप मोरे वय 25 वर्ष यांच्या सोबत प्रेमविवाह 2021 मध्ये झाला होता. या प्रेम विवाहास मान्यता न मिळाल्याने शेवटी त्यांनी दि.11/5/22 रोजी सम्राट अशोक बुद्ध विहार दारव्हा येथे विवाह केला. परंतु दोघांमध्ये कौटुंबिक वाद होत असल्याने शेवटी घटस्फोट घेण्याचे ठरविण्यात आले होते व त्यानुसार पोलीस विभाग अंतर्गत कौटुंबिक समुपदेशन करण्याचे कारवाई चालू असल्याचे माहिती मिळाली आहे.
अशातच हे दोघे काल दुपारी एक वाजताच्या दरम्यान शनी मंदिर परिसरातील पंजाब नॅशनल बँक समोरील हॉटेल सनी प्राइड या लॉज मध्ये थांबले होते. सनी प्राइड हॉटेलचे मालक प्रशिक देवेंद्र खडसे यांनी आवाज दिला असता सायंकाळी सात वाजेपर्यंत रूममधून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने. लॉज मालकाने पोलीस स्टेशन पुसद शहर गाठले.
पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन बंद असलेल्या रूमचे दार तोडून आत मध्ये प्रवेश केला असता, बेडवर नग्न अवस्थेत सौ. सपना संजय मोरे हिचा मृतदेह आढळला. तोपर्यत मृतक सपनाचा पती संजय प्रदीप मोरे हा हॉटेलमधून फरार झाला होता. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी आरोपी शोध मोहिम घेऊन आरोपीला त्वरित अटक केली.
घटनास्थळी नायब तहसीलदार इंगोले, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर, पोलीस कर्मचारी अतुल दातीर, गोपनीय विभागाचे नितेश भालेराव, पोलीस महिला कर्मचारी इत्यादीच्या मदतीने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय पुसद येथे पाठविण्यात आला.
पुसद शहरातील लॉजिंग बोर्डिंग क्षेत्रात अशा घटना घडत असल्याने जनतेच्या मनात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
– ब्यूरो रिपोर्ट




.jpeg)
