- भिम टायगर सेनेचा स्तुत्य उपक्रम
दि.१४ एप्रिल २०२४
समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुभाव टिकवण्या सोबतच लोकशाही मजबूत करण्यासाठी बाबासाहेबांचे संविधान जनजागृतींचे कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा डॉ. बाबासाहेबांच्या 133 व्या जयंती निमित्ताने भव्य दिव्य स्टेजवर निळा फेटा बांधून सन्मान केला. असा उपक्रम भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे यांनी राबविला.
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने सर्वत्र जल्लोष होत असतो. डॉक्टर बाबासाहेबांना मानणारे सर्वधर्मीय आपापल्या परीने अन्नदानातून व विविध सामाजिक उपक्रम राबवतात. महामानवांचे विचार तेवत ठेवण्यासाठी व त्यांच्या विचाराची उजळणी व्हावी म्हणून जयंती दिनी मोठ्या प्रमाणात हर्ष उल्हासात साजरी करतात. त्याचप्रमाणे पुसद शहरातील वार्डा-वार्डातून भीम जयंती ची रॅली मुख्य मार्गाने मार्गस्थ होत असते. संपूर्ण आठवडाभर प्रबोधनातून जयंती उत्सव साजरा केला जातो.
या पावन दिनी बाबासाहेबांच्या विचारावर चालणाऱ्या समाजसेवकांचा सन्मान होणे गरजेचे असते हे पाहून भीम टायगर सेनेच्या वतीने मागील काही वर्षापासून भीम जयंतीच्या निमित्ताने भव्य दिव्य मंडप उभारून त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार केला जातो. याही वर्षी मोठ्या प्रमाणात आयोजन करून वॉर्ड -वार्डातील मंडळांचे अध्यक्ष पदाधिकाऱ्यांना निळा फेटा बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे कुठल्याही मजबुतीचे काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकारांचा सुद्धा यावेळी भीम टायगर सेनेच्या वतीने निळा फेटा बांधून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रज्ञापर्वाचे माजी अध्यक्ष भीमराव कांबळे, तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा ययाती नाईक, लिखित शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष महेश खडसे, बिरसा ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष मारोती भस्मे, माजी नगरसेवक साकिब शहा,, व्हॉईस ऑफ मीडियाचे पुसद तालुका अध्यक्ष समाधान केवटे युवा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश ढोले
आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची धुप दीपाने पूजा करण्यात आली. व या कार्यक्रमाचे आपल्या प्रास्ताविकातून भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे यांनी स्पष्ट केले.
सदर सामाजिक उपक्रम यशस्वी करण्यासाठी भीम टायगर सेनेचे अण्णा दोडके, युवराज कांबळे, दीपक गायकवाड, राजकुमार पठाडे, जनार्धन झोडगे, गजानन कांबळे, विनोद जाधव, सचिन वंजारे, कृष्णा दोडके, गीता कांबळे, पंडित पवार अदिन सह भिम टायगर सेनेचे कार्यकर्ता पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विष्णू सरकटे यांनी मांडले,




