डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणुकीत छेडखानीची घटना –
पाच टवाळखोरा विरुद्ध छेडखानीसह ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल
पुसद प्रतिनिधी –
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी निघालेल्या रॅलीमध्ये युवतीची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना युवतीचे नातेवाईकांनी जाब विचारला. तो राग मनात धरून आज त्या पाच टवाळखोरांनी जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना भोजला येथे घडली. या घटनेची माहिती भिम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे यांना कळताच त्यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठून घटनेचे गंभीर दखल घेण्यास पोलिसांना सांगितले. यावेळी गावकऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता. युवतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी मारहाण छेडखानी व ॲट्रॉसिटीच्या विविध कलमा नुसार गुन्हे दाखल करून आरोपींना ताब्यात घेतले आहे.
हे ही वाचा 👉 धम्मक्रांती प्रज्ञापर्वात नितीन सावंत यांचे व्याख्यान
वसंतनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येणाऱ्या भोजला येथील ही घटना आहे. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती रॅली गावातून निघाली होती. या रॅलीमध्ये एका बावीस वर्षीय मुलीची आकाश काकडे हा छेडखानी करून तिच्या नावाने बोंबा मारत होता. यावरून त्या ठिकाणी उपस्थित युवतीच्या नातेवाईकांनी त्याला रोखले होते. याचा वचपा काढण्यासाठी आकाशने गैर कायद्याचे मंडळी जमवून पाच जणांनी मिळून आज १५ एप्रिल रोजी सकाळी वैभव जोगदंडे यास मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना झाली.
हे ही वाचा 👉 सामाजिक उपक्रमा अंतर्गत सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान
युवतीच्या तक्रारीवरून भोजला येथील आकाश विजय काकडे वय २५ वर्ष, शुभम काकडे वय २५ वर्ष, कृष्णा काकडे वय २५ वर्ष, व परमेश्वर लक्ष्मण काकडे वय ४५ वर्ष. या पाच टवाळखोर आरोपी यांचे विरुद्ध भादवी ची कलम 324, 143 147 504 506 व 354, 354-D तसेच अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ चे कलम 3(2)(va), 3(1)(w), 3(1)(w)(ii), 3(1)(r), 3(1)(s) अश्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्याची कारवाई पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर पंत यांनी केली आहे. गुन्हे दाखल करण्यासाठी व कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने भिम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे भालेराव, भीम आर्मीचे अशोक भालेराव, बिरसा ब्रिगेडचे मारोती भस्मे, सामाजिक कार्यकर्ते बाबाराव उबाळे उपस्थीत होते.




