Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsमुख्य कार्यकारी अधिकारी यांची चोंढी ग्रामपंचायतला भेट

मुख्य कार्यकारी अधिकारी यांची चोंढी ग्रामपंचायतला भेट

पुसद (ब्यूरो रिपोर्ट) –

        पुसद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या चोंढी ग्रामपंचायतीला यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांनी भेट देऊन पाहणी केली. गावाच्या विकासाबाबत आढावा घेतला.

        त्यांनी प्रथम चोंढी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या, बांधकाम केल्यानंतर अर्धवट असलेल्या, इमारत लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या नंतर ग्रामपंचायत कार्यालयात विविध विषयांचा आढावा घेऊन जनसुविधा मोदी आवास योजना, नरेगांतर्गत झालेली कामे, ग्रामपंचायतीचे काम पाहून समाधान व्यक्त केले. 

        यावेळी पंचायत गटविकास अधिकारी संजय राठोड, विस्तार अधिकारी टी. डी. चव्हाण, डाखोरे, पिंपळे, शिक्षण विभागाचे अमित बोजेवार, मुख्याध्यापक मळघणे, सरपंच मनीषा पांडे, उपसरपंच पृथ्वीराज चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य दिनेश हिडे, ज्ञानेश्वर पांडे, दत्तराव गरिबे, अंगणवाडी सेविका कवितां आगलावे, ग्रामसेवक विजय इसलकर, पोलिस पाटील व गावातील नागरिक उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या भेटीमुळे कामे लवकर होतील, अशी आशा गावातील नागरिकांच्या मनात  निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments