Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsभावनाताईना तिकीट द्या | दत्त चौकात राडा | Raw Bharat

भावनाताईना तिकीट द्या | दत्त चौकात राडा | Raw Bharat

राजश्री, हेमंत पाटील नाही, भावनांना तिकीट द्या … 
भावनाताई समर्थकांचा दत्त चौकात राडा 

यवतमाळ : 

        दत्त चौकात बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास भावना गवळी यांच्या समर्थकांनी यवतमाळ वाशीममधून विद्यमान खासदार भावना गवळी यांना लोकसभेचे तिकीट मिळावे,अशी मागणी करत दत्त चौकात घोषणाबाजी केली.

        शिंदे गटाकडून राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर करावी, अशी मागणी भावना गवळी समर्थकांकडून होत होती. राजश्री पाटील यांच्या घोषित उमेदवारीमुळे भावना समर्थक पूर्णत: नाराज आहेत. भावना समर्थकांनी स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे.

        यावेळी समर्थकांनी सांगितले की, 2012 च्या नांदेड जिल्हा परिषद निवडणुकीत वाडीतून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार म्हणून राजश्री पाटील यांचा पराभव झाला होता. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार अपक्ष दुसऱ्या तर राजश्री हेमंत पाटील तिसऱ्या क्रमांकावर आहेत. हेमंत पाटील हिंगोली लोकसभा मतदारसंघातून खासदार असताना निष्क्रिय खासदार म्हणून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. पत्नी जिल्हा परिषद व विधानसभेत पराभूत झाल्यानंतरही त्यांना येथे देण्याचे कारण काय? खासदार भावना गवळी या सलग 5 वेळा अपराजित खासदार असून, वाढत्या मताधिक्याने निवडणूक जिंकूनही त्यांचे तिकीट का रद्द करण्यात आले ?

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments