दिनांक 30 मार्च 2024 ला माजी प्राचार्य डॉ उत्तम रुद्रावार यांचे अध्यक्षतेखाली तसेच प्रमुख अतिथी सौ मोहिनीताई इंद्रनील नाईक, डॉ सौ आरतीताई फुपाटे, डॉ सचिन कोठारी, डॉ विरेन पापळकर, डॉ भानुप्रकाश कदम, डॉ प्रा बुब, डॉ हरिभाऊ फूफाटे, या सर्वांचे प्रमुख उपस्थितीत आहाळे मल्टीस्पेशालिटी अँड क्रिटिकल हॉस्पिटल गुरुकृपा मेडिकल चा भव्य शुभारंभ डॉक्टर अमित आहे यांचे वडील
प्रा सुरेंद्र आहाळे तथा आई यांच्या शुभहस्ते पार पडला.
सौ मोहिनीताई नाईक यांनी आपल्या सदिच्छा पर भाषणात पुसदच्या आजूबाजूला असलेला ग्रामीण भाग तसेच त्या भागाकरिता आवश्यक असलेल्या सर्व सुख सुविधा आता पुसद मध्ये उपलब्ध मिळतील याचा आनंद व्यक्त केला. पुसदचे डॉक्टरांकडून पवित्र आणि निर्मल मनाने रुग्णसेवा केली जात असल्याचा वास्तव अभिमान असल्याचेही त्यांनी डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. वडिलांच्या संस्काराने गोरगरिबांची सेवा करण्यासाठी आहाळे दांपत्य पुसद मध्ये रुग्णसेवा करण्यासाठी आले असल्याचे सांगत डॉक्टर आहाळे परिवाराला रूग्नसेवेच्या शुभेच्छा दिल्या.
मेडिकल हॉस्पिटलचे संचालक डॉ. वीरेन पापळकर यांनी आपल्या हसमुख शैलीमध्ये डॉ अमित आहाळे याचे कौतुक केले. डॉ अमित एक गुणी व संस्कारी घरातून आल्यामुळे तो या क्षेत्रात आपले कार्य चांगल्या प्रकारे पार अशा शुभेच्छा दिल्या. तर डॉक्टर संदीप सुराणा संचालक सिटी केअर हॉस्पिटल अहमदनगर यांनी सुद्धा आपली उपस्थिती या कार्यक्रमासाठी दर्शविली होती त्यांनी सांगितले की डॉ अमित बरोबर तीन वर्षे सहवास राहिलेला आहे तो अत्यंत निषणांतआणि काळजीपूर्वक काम करणारा एक तज्ञ डॉक्टर आहे तसेच त्याची मिसेस डॉ प्राची आहाळे ही सुद्धा अत्यंत कष्टाळू व तज्ञ तसेच गुणी स्वभावाची आहे. यांच्या मल्टी स्पेशालिटी अँड क्रिटिकल हॉस्पिटल साठी त्यांनी आपल्या सदिच्छा व्यक्त केल्या. तर अध्यक्षीय भाषणामध्ये माजी प्राचार्य डॉ प्रा उत्तम रुद्रावार यांनी प्राध्यापक सुरेंद्र आहाळे यांनी केलेल्या मेहनतीचे आज फलित पाहायला भेटले तसेच त्यांची सर्व मुलं अत्यंत गुणी व उच्चविद्याविभूषित असून दोन डॉक्टर तसेच त्यांची स्नुषा प्राची ही सुद्धा डॉक्टर असल्याचा सार्थ अभिमान व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन धनंजय रोकडे यांनी डॉ अमित आहाळे यांनी यांनी मानले.




