मोहिनी नाईक, निलय नाईक व संजय राठोड यांना उमेदवारी न दिल्याने अपक्ष उमेदवारी भरा …
बंजारा समाजाचा राजकीय पक्षांना इशारा व समाजाला आवाहन
पुसद –
महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाचे दीड कोटीच्या जवळपास लोकसंख्या आहेत. बंजारा समाजाचे 75 लाख एवढे मतदान असून सुद्धा कोणत्याही राजकीय पक्षांनी बंजारा समाजाच्या नेत्यांना उमेदवारी दिलेली नाही,त्यामुळे बंजारा समाजात राजकीय पक्षाविरुद्ध प्रचंड नाराजीचा सूर उमटत आहेत. विशेष म्हणजे ज्या नाईक घराण्यांनी राज्याचं सर्वांधिक काळ मुख्यमंत्री म्हणुन नेतृत्व केलं त्या घराण्यातील यवतमाळ – वाशिम लोकसभेत उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती.
मात्र मोहिनी नाईक, निलय नाईक यांचेसह संजय राठोड यांना उमेदवारी न दिल्याने व महाराष्ट्र मध्ये अनेक मतदार संघात बंजारा समाजाला एकाही राजकीय पक्षाने उमेदवारी दिली नाही. बंजारा समाजांनी एकजुटीने लढून यवतमाळ -वाशिम, हिंगोली, नांदेड, जालना बीड इंथे अपक्ष उमेदवार उभे करून राजकीय पक्षांना धडा शिकविण्याचे आवाहन जेष्ठ साहित्यिक प्राध्यापक पंजाब चव्हाण यांनी केलाय. तसेच हे आवाहन म्हणजे राजकीय पक्षांना मोठा इशारा असल्याचे मानले जात आहे आता यावर काय परिणाम होतो याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले.
ब्यूरो रिपोर्ट – रॉ भारत
आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, रोजगार विषयक बातम्या पाहण्यासाठी आमच्या चैनल ला subscribe करा. तसेच आपल्या जाहिराती साठी तथा बातम्यासाठी आमच्याशी संपर्क करा –
रवि शिंगनकर ( मुख्य संपादक) – मो. नं 8788864298
अरुण बरडे (सह संपादक) मो. नं. 9921722726




