Thursday, April 23, 2026
Google search engine
Homenewsवृद्ध कलावंतांच्या मानधनात दुप्पट वाढ | Raw Bharat | Pusad news

वृद्ध कलावंतांच्या मानधनात दुप्पट वाढ | Raw Bharat | Pusad news

 

वृद्ध कलावंतांच्या मानधनात दुप्पट वाढ. गुरुदेव सेवा मंडळाने मानले शासनाचे आभार

पुसद प्रतिनिधी :

      राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंत यांच्या मानधनात राज्य शासनाने नुकतीच 2250 रुपयांवरून 5 हजार रुपये एवढी दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या एप्रिलपासून करण्यात येणार आहे. यामुळे यवतमाळ जिल्ह्यासह राज्यातील तब्बल तीन हजार वृद्ध कलावंतांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबद्दल गुरुदेव सेवा मंडळ,पुसद तालुका शाखेच्यावतीने शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले. स्थानिक देशमुखनगरमधील मंडळाच्या प्रार्थनास्थळी आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थनेच्यावेळी शासनाच्या आभारासंबंधीचा ठराव घेण्यात आला. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष प्रा प्रकाश लामणे होते. यावेळी सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते मानवतेचे महान पुजारी, ग्रामगीता निर्माते वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आली. त्यानंतर मंडळाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष तथा वृद्ध कलावंत मनोहरदादा बनस्कर यांनी वृद्ध कलावंतांच्या मानधनात दरमहा 5 हजार रुपये एवढी दुप्पट वाढ केल्याने शासनाचे आभार व्यक्त करण्याची सूचना मांडली

त्याला मंडळाचे सहकोषाध्यक्ष तथा वृद्ध कलावंत माधवराव जाधव यांनी अनुमोदन दिले.
याप्रसंगी उपस्थित वृद्ध कलावंतांनी एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. उपस्थित गुरुदेव अनुयायांचे आभार मंडळाचे कार्याध्यक्ष प्रा नंदकुमार खैरे यांनी मानले. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, अनुयायी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने वृद्ध कलाकारांच्या मानधनात वाढ करावी, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री, पालकमंत्री व सांस्कृतिक कार्य संचालनालय आदींना मागील अनेक वर्षांपासून निवेदने दिली व सातत्याने पत्रव्यवहार केला. त्याचे फलित म्हणून शासनाने 15 मार्च रोजी वृद्ध कलाकारांच्या मानधनात कोणतीही वर्गवारी न करता सरसकट 5 हजार रुपये एवढी दुप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला. याचा खूप आनंद आहे. यामुळे कलावंतांना न्याय मिळाल्याची भावना आहे.
मनोहरदादा बनस्कर
92 वर्षीय वृद्ध कलाकार, पुसद

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments