Thursday, February 19, 2026
Google search engine
Homenewsवैकुंठ धाम खंडाळा येथे श्री महादेव मूर्तीची स्थापना | Raw Bharat

वैकुंठ धाम खंडाळा येथे श्री महादेव मूर्तीची स्थापना | Raw Bharat

वैकुंठ धाम खंडाळा येथे श्री महादेव मूर्तीची स्थापना

पुसद प्रतिनिधी –

        पुसद तालुक्यातील खंडाळा या ठिकाणी मोठ्या आनंद उत्सवाने वैकुंठधाम मध्ये महादेव मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. सोबतच नंदी देवाची सुद्धा यावेळी स्थापना करण्यात आली. होमहवन, पूजा अर्चना, भजन कीर्तन व संपूर्ण गावातून दिंडी काढत या भूमिपूजन व प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन केले होते. या दिव्य सोहळ्यास गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. 

        मानवी शरीर हे नश्वर असून या शरीराचा अंतरिम पड़ाव हा याच ठिकाणी होत असतो.  देवादी देव महादेव यांचा अशाच ठिकाणी वास असतो. या ठिकाणी मानवी मन  प्रसन्न राहावे या करीता महादेव मुर्तीची  स्थापना करण्यात आली.  

        सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी प्रल्हाद संभाजी गायकवाड यांच्या प्रमुख मार्गदर्शनात तथा खंडाळाचे सरपंच विलास देविदास गायकवाड यांच्या पुढाकाराने किसन उमाजी वैद्य, दत्तराव बुगाजी गायकवाड, बाबुराव जनार्दन गायकवाड, दीपकराव जनार्दन गायकवाड, विलास बाबुराव गायकवाड, विठ्ठलराव पुंडलिकराव गायकवाड, पंढरीनाथ देवबा मोटे, लिलाबाई प्रल्हाद गायकवाड, सौ स्वाती विलास गायकवाड, मंदाबाई जगन भुसारे, वनिताबाई विलास गायकवाड, श्रीमती मिनाबाई माधवराव मोटे, सौ लिलाबाई किसन वैद्य यांनी अथक परिश्रम घेतले आहे.

ब्यूरो रिपोर्ट – रॉ भारत 

आपल्या परिसरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, रोजगार विषयक बातम्या पाहण्यासाठी आमच्या चैनल ला subscribe करा. तसेच आपल्या जाहिराती साठी तथा बातम्यासाठी आमच्याशी संपर्क करा –

  • रवि शिंगनकर ( मुख्य संपादक) – मो. नं 8788864298
  • अरुण बरडे (सह संपादक)  मो. नं.  9921722726
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments