डिलेव्हरीसाठी उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारीकडून पैशाची मागणी
- उपजिल्हा रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मातेचा मृत्यू
- सीझरींगनंतर योग्य काळजी न घेतल्याने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
- डिलेव्हरीसाठी उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारीकडून पैशाची मागणी
- पाच हजार रुपये डिलिव्हरीसाठी घेतले, नातेवाईकांचा आरोप
- सावरगाव गोरे येथील रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू, नातेवाईक नागरिक संतप्त
- न्याय मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईकांची भूमिका
पुसद प्रतिनिधी –
सरकारी दवाखान्यात डिलिव्हरी साठी पैशाचे मागणी होण्याची बाब या मृत्यू प्रकरणाने समोर आली. पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी डॉक्टरांनी पाच हजार रुपये घेऊन सिझरिंग करून डिलिव्हरी केली. परंतु ऑपरेशनच्या रुग्णाची योग्य ती काळजी न घेतल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी आक्रोश करीत व्यक्त केला.
सिजरिंग नंतर रुग्णाला पुसद येथील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. परंतु त्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसा देऊनही रुग्णाचा जीव वाचला नाही. नातेवाईक आमचा जीव परत द्या, दोशींवर कारवाई करा असा आक्रोश करीत आहे.
याबाबत उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक अतुल रुणवाल यांनी या प्रकरणी सखोल चौकशी करण्याच्या दृष्टीने यवतमाळ येथील वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन अहवाल करण्यात येईल व योग्य त्या चौकशी अंति कारवाई करू अशी प्रतिक्रिया डॉक्टर रुणवाल यांनी मीडियाशी बोलताना दिले.




